विशेष प्रतिनिधी
मुंबई- द काश्मीर फाईल्स हा चित्रपट सध्या गाजत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील हा चित्रपट पाहून भारावून गेले. या चित्रपटाच्या निर्मितीला मराठी हातांचेही पाठबळ लाभले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना त्यांच्या पत्नी आणि अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी त्यासाठी खूप मदत केली आहे.Marathi hands also support the creation of The Kashmir Files, this person inspired Vivek Agnihotri
विवेक आणि पल्लवी जोशीने १९९७ मध्ये लग्न केलं. त्यांना दोन मुलं आहेत. पल्लवी जोशी हे मराठी इंडस्ट्रीमधील एक लोकप्रिय नाव आहे. तिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये विशेष ज्युरी पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.
विवेक यांचा जन्म ग्वाल्हेरमध्ये झाला. ते एक चित्रपट दिग्दर्शक, लेखक , पटकथा लेखक आणि कार्यकर्ते आहेत. २०१९ मध्ये त्यांना ‘द ताश्कंद फाइल्स’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा संवाद यासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी आपल्या करियरची सुरुवात एका जाहिरात एजन्सीमधून केली होती.
यानंतर त्यांनी अनेक टीव्ही मालिकांची निर्मिती आणि दिग्दर्शन केले. २००५ मध्ये रिलीज झालेल्या क्राइम-थ्रिलर ‘चॉकलेट’ हा चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आणि त्यानंतर अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. मात्र, ते चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी होऊ शकले नाहीत.
चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान काश्मीरमध्ये निमार्ता आणि दिग्दर्शकाच्या विरोधात फतवा काढण्यात आला होता. ‘द काश्मीर फाइल्स’मुळे लोकांनी विवेक अग्निहोत्री यांना देवाचा दर्जा दिला आहे. चित्रपट पाहिल्यानंतर एक महिला रडत म्हणाली, तू आमचा देव आहेस, कारण तू आमचं सत्य दाखवलं आहेस. कमी बजेटमध्ये आणि कोणत्याही मोठ्या बॉलिवूड स्टारशिवाय बनलेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
Marathi hands also support the creation of The Kashmir Files, this person inspired Vivek Agnihotri
महत्त्वाच्या बातम्या
- Congress Debacle : काँग्रेस कार्यकारिणी गांधी परिवाराची “पाठ राखी”; पण सोनियांनी उगारली 5 प्रदेशाध्यक्षांवर काठी!!
- प्रविण दरेकर यांच्यावरील कारवाई सुडबुद्धीने नाही ; महेश तपासे यांचा दावा
- रखडलेल्या प्रकल्पांच्या यादीत पुण्यातील ४,८०० सदनिका
- हिजाबशिवाय महाविद्यालयात जाणार नाही उडुपी येथील मुस्लिम मुलींचा निर्धार