सध्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत पोस्ट केला व्हिडिओ.
विशेष प्रतिनिधी
पुणे : दोन जुलै ला महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा महा भूकंप झाला. आणि त्याच्या प्रतिक्रिया सर्वच क्षेत्रातून उमटल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडली. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी भाजपाशी घरोबा करत . नऊमंत्र्यांना सोबत घेतं उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हे सगळं राजकीय सत्ता नाट्य घडत असताना . सर्वसामान्य लोकांनी अतिशय बोचऱ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.Marathi film actor Sayaji shinde post video.
यामध्ये मनोरंजन विश्व देखील कुठेच मागे नव्हतं. आपापल्या समाज माध्यमातून अनेक कलाकार या सगळ्या एकंदरच परिस्थितीबद्दल व्यक्त झाले .यामध्ये वृक्षप्रेमी आणि ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला. सध्याच्या या राजकीय सत्ता नाट्याबद्दल सयाजी शिंदे आणि एकदम मिश्किल शैलीत या सगळ्या परिस्थितीवर भाष्य केलं. आणि जनतेला देखील चिमटा काढला.
या व्हिडीओत सयाजी शिंदे काही गावकऱ्यांबरोबर दिसत आहेत. त्यांच्यामागे घनदाट झाडी आहे. व्हिडीओतून सयाजी शिंदे म्हणतात, “महाराष्ट्रातल्या सगळ्यांना शुभ सकाळ. उठलात?.. आता सगळ्यांनी झोपा आणि कुठल्याही पक्षाला फॉलो करू नका. जर कुठल्या पक्ष्याला फॉलो करायचंच असेल, तर घुबडाला करा.” सयाजी शिंदेंच्या या मजेशीर व्हिडीओला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. चाहत्यांनी कमेंटद्वारे सहमतीही दर्शवली आहे.यापूर्वी देखील सयाजी शिंदे यांनी राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारा मी पुन्हा येईल या वेब सिरीज मधला व्हिडिओ पोस्ट केला होता.
Marathi film actor Sayaji shinde post video.
महत्वाच्या बातम्या
- भुजबळांनी उलगडले बंडाचे “रहस्य”; शरद पवार आमचे गुरु, गुरुपौर्णिमेलाच त्यांना दिली सत्तेची गुरुदक्षिणा!!
- आता समान नागरी कायदा लागू करण्याची वेळ आली आहे, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे वक्तव्य
- पवारांचा आदेश धुडकावून अजितदादांच्या मेळाव्यात भुजबळांच्या एमईटीत शरद पवारांची पोस्टर्स!!; 41 आमदार गटात असल्याचा तटकरेंचा दावा
- विरोधी पक्षनेतेपदाबाबत काँग्रेसचे वेट अँड वॉच, आमदारांच्या बैठकीत कोणतीही चर्चा नाही