• Download App
    अभिनेत्री प्राजक्ता माळीन खरेदी केलं नवीन घर.. "खानदानातील सर्वात सुंदर प्रॉपर्टी खानदानातल्या सगळ्यात मोठ्या कर्जासहित "असं म्हणत शेअर केली पोस्ट..| Marathi actress Prajakta Mali new farmhouse.

    अभिनेत्री प्राजक्ता माळीन खरेदी केलं नवीन घर.. “खानदानातील सर्वात सुंदर प्रॉपर्टी खानदानातल्या सगळ्यात मोठ्या कर्जासहित “असं म्हणत शेअर केली पोस्ट..

    विशेष प्रतिनिधी

    पुणे :प्राजक्ता माळी मराठी मनोरंजन विश्वातली सुंदर आणि डोळस अभिनेत्री. प्राजक्ताने आपल्या अभिनयाच्या आणि निवेदनाच्या जोरावर महाराष्ट्राच्या घराघरात आणि मनामनात आपलं स्थान निर्माण केलं. प्राजक्ता जितकी उत्तम अभिनेत्री तितकीच संवेदनशील कवी आहे . प्राजक्ताने आपली मराठी संस्कृती आणि मराठी अलंकार समाजासमोर पोहोचावेत . तरुण पिढीला आपल्या पारंपारिक मराठी दागिन्यांची ओळख व्हावी त्या दागिन्याच्या मोह व्हावा, यासाठी काही वर्षांपूर्वी “प्राजक्ता राज ” हा मराठमोळ्या दागिन्यांचा ब्रँड तिने सुरू केला . Marathi actress Prajakta Mali new farmhouse.

    अल्पावधीतच तिच्या या उत्तम उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतोय. अभिनय कवयित्री निवेदन या क्षेत्रा यशस्वीपणे वावरत असतानाच प्राजक्ताचे नुकतच एक स्वप्न पूर्ण झालंय आहे. त्याची कबुली तिने नुकतीच दिली.



    प्राजक्ता आपल्या समाज माध्यमाच्या माध्यमातून कायमच आपल्या चाहत्यांपर्यंत आपल्या आयुष्यातल्या घटना शेअर करत असते. प्राजक्ताने कर्जत येथे स्वतःच फार्म हाऊस घेतलं आहे.प्राजक्ताने ही बातमी समाज माध्यमातून दिली. प्राजक्ताने आपलं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठं कर्ज घेतलंय असंही तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

    “खानदानातील सर्वात सुंदर प्रॉपर्टी खानदानातल्या सगळ्यात मोठ्या कर्जासहित “असं म्हणत तिने ही बातमी दिली आहे .डोंगराच्या कुशीत आणि निसर्गाच्या सानिध्यात घर हवं ही एकच अट होती. आणि मनासारखं घर मिळालं. असं म्हणत तिने नवीन घराचा आनंद व्यक्त केला आहे. ‘गुरुकृपा ‘असा हॅशटॅग करत प्राजक्ताने गुरु विषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. प्राजक्ता ही श्री श्री रविशंकर यांची अनुयायी असून वेळोवेळी ती आपल्या गुरु उपासने बद्दल सांगत असते.काही दिवसांपुर्वी टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, प्राजक्ताने तिचं हक्काचं घर घेतल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती.प्राजक्ताने नुकत्याच एका यु ट्यूब शोमध्ये या गोष्टीचा खुलासा केलाय. प्राजक्ताने पुण्यात घर घेतलंय.

    एका टॉवरमध्ये १७ व्या मजल्यावर प्राजक्ताने हे घर बुक केलंय. प्राजक्ताने रजिस्ट्रेशन आणि इतर कागदपत्रांची पूर्तता केलीय.प्राजक्ताने या ठिकाणी घेतलंय नवीन घर ?प्राजक्ताने कर्जतला नवीन घर घेतलंय. कर्जतला निसर्गरम्य वातावरणात डोंगराच्या पायथ्याशी घर घेतलंय. प्राजक्ताने नवीन घराचे फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केलेत. हे फोटो पोस्ट करुन प्राजक्ता लिहीते. “स्वप्न साकार…Happy owner of my dream “Farm House” (डोंगराच्या कुशीत, निसर्गाच्या सानिध्यात घर पाहिजे,एवढीच अट होती. अगदी मनासारखं घर मिळालं.) कर्जत.. नाव असणार आहे- “प्राजक्तकुंज”.(प्राजक्तत्रयी पुर्ण.)प्राजक्ता शेवटी कर्जासंबंधी लिहीते की.. खानदानातली सर्वात सुंदर property, खानदानातल्या.. सर्वात मोठ्या कर्जासहीत.. फेडू.. फक्त तुमचा आशिर्वाद राहू द्या. #हक्काचं_घर #प्राजक्तकुंज #गुरुकृपा अशी पोस्ट करत प्राजक्ताने नवीन घराविषयी माहिती दिलीय.

    Marathi actress Prajakta Mali new farmhouse.

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    देशी गायींचे संवर्धन करुनच खऱ्या अर्थाने शेतीला, शेतकऱ्यांना स्वयंपूर्णतेकडे नेऊ शकतो – देवेंद्र फडणवीस

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!