भाजपा हा जगातील बलशाली पक्ष. पक्षप्रवेश करतातचं मेधाची पहिलीचं प्रतिक्रिया
विशेष प्रतिनिधी
पुणे : सध्या मनोरंजन क्षेत्रामध्ये राजकीय पक्षप्रवेशाचे वारे वाहतात दिसत आहेत. अनेक अभिनेते, अभिनेत्री वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये प्रवेश करताना दिसतात.नुकताच अभिनेत्री, निर्माती आणि बिग बॉस मराठी सीजन एक ची विजेती धाकड गर्ल मेधा धाडे हिने भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. Marathi actress Medha Dhade join the BJP party
मेधाच्या पक्ष प्रवेश प्रसंगी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील , महामंत्री विजय चौधरी व सांस्कृतिक प्रकोष्टच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्रीमती प्रियाबेर्डे आदींच्या उपस्थितीत मेधानं कमळ हाती घेतलं.
भाजप हा जगातील सर्वात शक्तिशाली पक्ष आहे अशी प्रतिक्रिया पक्षप्रवेशानंतर मेधाने दिली.
भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर मेधाने आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पोस्ट लिहीत आणि फोटो शेअर करत,आपल्या भावना व्यक्त केल्या. ती लिहिते नमस्कार वंदे मातरम ! मला आपणास सगळ्यांना कळवण्यास अत्यंत आनंद होतोय की , तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि शुभेच्छांनी मी माझा आवडता आणि जगातला सगळ्यात मोठा बलशाली पक्ष म्हणजेच भारतीय जनता पार्टीत रीतसर प्रवेश केला आहे.
मेघाने फोटो पोस्ट करून पुढे लिहिलंय की..”हे मी माझे अहोभाग्य समजते की काल ज्यांच्या उपस्थितीत माझी प्रवेश प्रक्रिया पार पडली ते भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब , महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्री विक्रांत जी पाटील , महामंत्री श्री विजयजी चौधरी व सांस्कृतिक प्रकोष्टच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्रीमती प्रियाताई बेर्डे यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाने हा प्रवेश प्रक्रियेचा कार्यक्रम पार पडला.
Marathi actress Medha Dhade join the BJP party
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्र शासन, NSE आणि ‘मनी बी’ यांच्यात त्रिपक्षीय सामंजस्य करार
- UCC : समान नागरी कायद्याची दीर्घ प्रतिक्षा संपण्याच्या बेतात; कायदे आयोगाने नागरिक, धार्मिक संघटनांकडून मागविल्या सूचना
- तामिळनाडूत तपासासाठी आता CBIला घ्यावी लागणार परवानगी
- विरोधकांचे होईना ऐक्य, तरी लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुकांचे नितीश कुमार यांचे भाकीत!!