विशेष प्रतिनिधी
पुणे : मराठी नाटक आणि सिनेमा जगतातील प्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्याविरुद्ध पत्नीचा छळ केल्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनय क्षेत्रामध्ये पत्नीचे नाव आपल्यापेक्षा मोठे होईल या भीतीने तिला वारंवार मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.Marathi actor Aniket Vishwasrao abuses his wife
अलंकार पोलिसांनी अनिकेत विश्वासराव, सासरे चंद्रशेखर विश्वासराव आणि सासू आदिती विश्वासराव (सर्व रा. विश्वासराव रेसिडेन्सी, मुंबई) यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अभिनेत्री स्नेहा अनिकेत विश्वासराव (वय 29, रा. करिष्मा सोसायटी, कोथरूड) हिने फिर्याद दिली आहे.
अलंकार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत हा मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेता आहे. तर स्नेहा हेदेखील अभिनेत्री आहे. दोघांनीही काही प्रोजेक्ट मध्ये एकत्र काम केले आहे. या दोघांमध्ये प्रेम जुळल्यानंतर त्यांनी प्रेमविवाह केला होता.
लग्न झाल्यापासून अनिकेत याने त्याचे अनैतिक संबंध तिच्यापासून लपून ठेवले. तसेच अभिनेत्री स्नेहाचे नाव आपल्यापेक्षा मोठे होईल या भीतीने तिला शरीर सुखापासून वंचित ठेवले. यासोबतच वारंवार जीवे ठार मारण्याची धमकी देऊन हाताने मारहाण केली.
सार्वजनिक ठिकाणी आणि लोकांमध्ये अपमानास्पद वागणूक देऊन अतोनात छळ केल्याचे फिर्यादी मध्ये नमूद करण्यात आले आहे. अनिकेतकडून होत असलेल्या सर्व अत्याचारांमध्ये सासरे चंद्रशेखर आणि सासू आदिती यांनी मदत केल्याचेही फिर्यादी मध्ये म्हटले आहे.
Marathi actor Aniket Vishwasrao abuses his wife
महत्त्वाच्या बातम्या
- पवार निघाले ममतांच्या पाठोपाठ; दिल्लीत जाऊन काँग्रेस फोडली!!; जी – 23 मधला नेता लावला राष्ट्रवादीच्या गळाला!!
- पूर्वांचल एक्स्प्रेसवर दिसली देशाची एअर पॉवर, पंतप्रधान मोदींची हर्क्युलस विमानातून एक्स्प्रेसवर एंट्री
- काश्मीरमध्ये सुरक्षा दलाने दोन व्यापारी आणि दोन दहशतवाद्यांना टिपले
- दहशतवादाचा चिथावणीखोर झाकिर नाईकच्या इस्लामिक रिसर्च’वरील बंदी पुन्हा वाढविली