Thursday, 8 May 2025
  • Download App
    मराठे विधानसभेला ताकद दाखवतील, सरकार माझी निष्ठा विकत घेऊ शकत नाही; मनोज जरांगेंचा इशारा|Marathas will show strength to the assembly, the government cannot buy my loyalty; Manoj Jarang's warning

    मराठे विधानसभेला ताकद दाखवतील, सरकार माझी निष्ठा विकत घेऊ शकत नाही; मनोज जरांगेंचा इशारा

    विशेष प्रतिनिधी

    जालना : मराठा समाजात असा मेसेज गेलाय, आता आपल्याला न्याय मिळणार नाही, आपल्याला लढून मिळवावे लागणार आहे. मराठा समाजाचे गोरगरीब पोरं मोठे व्हावे यासाठी मी लढतोय. आता ही वेळ आहे, मराठ्यांना चारी बाजूने घेरलेले आहे. मराठा आमदारांनी आता एकत्र यावे आणि अधिवेशनात मराठा आरक्षणावर बोलावे. सरकारने माझ्यावर कितीही दबाव आणला तरी ते माझी निष्ठा विकत घेऊ शकणार नाही, असे म्हणत मनोज जरांगे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.Marathas will show strength to the assembly, the government cannot buy my loyalty; Manoj Jarang’s warning



    कितीही दहशत निर्माण करा, मी घाबरत नाही

    गेल्या काही दिवसांपासून आंतरवली सराटीत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या राहत्या घरावर ड्रोन फिरताना दिसून आला. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये व मराठा आंदोलकांमध्ये भीतीचे वातावरण होते. या पाश्वभूमीवर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही कितीही बदनाम करण्याचा, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी मला तुम्ही अडवू शकत नाही. तुम्ही मला मारू शकत नाही, नाहीतर कोट्यावधींचे आगीमोहोळ सोडेल का कुणाला.

    एका दगडात ड्रोनला पाडलं असते

    गेल्या चार पाच दिवसापासून आंतरवाली सराटीत ड्रोन येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ड्रोन खूप लांब आहे, तो टप्प्यातच येत नाही, नाहीतर एका गोट्यात आम्ही त्याला पाडलं असतं, असे म्हणत जरांगेंनी खिल्ली उडवली. त्यामुळे ते मला काय मारतात, त्यांनी त्या नादात पडू नये असे म्हणत मी कोणाला घाबरत नाही माझा रस्ता ‘क्लिअर’ असल्याचे ते म्हणाले.

    मराठे विधानसभेला ताकद दाखवतील

    मनोज जरांगे म्हणाले, मला ते मॅनेज करू शकत नाहीत. माझी निष्ठा विकत घेऊ शकत नाहीत. त्यामुळे तुमचे हे शेवटचे प्रयोग सुरु आहेत. हे खूप दिवसांपासून सुरु आहे. व्हिडिओ, रेकॉर्डिंग करायचे, समाजात गैरसमज पसरवायचे आणि मला तिथून हटवण्यासाठी हे सुरु आहे. मी मराठा समाज एकजूट ठेवल्यामुळे यांची ही पोटदुखी असल्याचे ते म्हणाले. मराठ्यांनी त्यांची ताकद दाखवली आता विधानसभेलाही ते दाखवतील असा इशारा त्यांनी दिला. त्यामुळंच त्यांनी असे प्रयोग करत असतील. कितीही झाकलं तरी थांबत नाही.

    Marathas will show strength to the assembly, the government cannot buy my loyalty; Manoj Jarang’s warning

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Developed Maharashtra 2047 : प्रशासनातील सुधारणा म्हणजेच ‘विकसित महाराष्ट्र 2047’ चा आराखडा

    Devendra Fadnavis : मुंबईतील प्रवास आता अधिक सुलभ अन् स्मार्ट – देवेंद्र फडणवीस

    सिंदूर समर्पणाने श्रद्धांजली : वीर हुतात्म्यांच्या स्मरणार्थ रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे ललिता सहस्रनाम पूजन आणि सिंदूर वितरण