विशेष प्रतिनिधी
हिंगोली : मराठा समाजाला आरक्षण नाही असे म्हणता, पण टक्क्यांची आकडेवारी पाहिली, तर सर्वाधिक फायदा मराठ्यांनाच अशी स्थिती आज आहे, असा दावा ओबीसींचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी आज आकडेवारीसह केला. Marathas benefit the most from reservation statement by bhujbal
ओबीसी समाजाच्या हाताखाली ओबीसी समाजाच्या अधिकाऱ्यांच्या हाताखाली मराठा समाजातल्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना काम करावे लागते. पण त्यांची लायकी आहे का??, असा सवाल जरांगे पाटलांनी विचारला होता. त्या सवालाला प्रत्युत्तर देताना छगन भुजबळ यांनी सगळी आकडेवारीच जाहीर करून टाकली.
हिंगोलीतल्या ओबीसी महामेळाव्यात छगन भुजबळांनी मराठा समाजाला सध्या मिळत असलेल्या आरक्षणाची आकडेवारीच जाहीर केली.
छगन भुजबळ म्हणाले :
मराठा समाजाला आरक्षण
नाही असं म्हणता पण त्या मराठा समाजालाच आरक्षणाचा सर्वाधिक फायदा झाला असून मोदींनी दिलेल्या 10 % आरक्षणामध्ये 85 % जागा या मराठा समाजाला मिळाल्या.
केंद्रीय लोकसेवेच्या आएएसमध्ये 15.50 %, तर आयपीएसमध्ये 28 % मराठा समाजाचेच लोक सामील
ईडब्ल्यूएस (EWS) आरक्षणात मध्ये 78 % मराठा समाजाला आरक्षण मिळाले.
मराठा समाजाचे लोकसेवा आयोगातील प्रतिनिधित्व
ए ग्रेड – 33.50 %
बी ग्रेड – 29 %
सी ग्रेड – 37 %
डी ग्रेड – 36 %
IAS – 15.50 %
IPS – 28 %
IFS – 18 %
मंत्रालय कॅडरमध्ये
ए ग्रेड – 37.50 %
बी ग्रेड – 52.30%
सी ग्रेड – 52 %
डी ग्रेड – 55.50 %
गेल्या वर्षभरात झालेल्या 650 नियुक्त्यांपैकी 85 % नियुक्त्या या मराठा समाजाला मिळाल्या आहेत.
मराठा समाजाला आर्थिक मदत
मराठा समाजामध्ये गरीब आहेत, आमचा त्यांना विरोध नाही, पण त्यांना आताही आरक्षणाचा लाभ मिळतोय. अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून 70 हजार लाभार्थ्यांना 5160 कोटी रुपये देण्यात आले. ओबीसींना अद्यापही तेवढे देण्यात आले नाहीत. राजर्षी शाहू महाराज शिष्युवृत्ती, पंजाबराव देशमुख महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजाला 10,500 कोटी रुपये देण्यात आले आहेत.
Marathas benefit the most from reservation statement by bhujbal
महत्वाच्या बातम्या
- Rajasthan Election 2023 : राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी झाले ७० टक्के मतदान
- शिक्षण सम्राट आणि प्रस्थापित मराठा नेतेच विकासाचे खरे विरोधक; प्रकाश आंबेडकरांनी घातला आरक्षणाच्या मूळ मुद्द्याला हात!!
- केरळच्या कोचीन विद्यापीठात चेंगराचेंगरी, 4 विद्यार्थ्यांचा मृत्यू, 60 जखमी; वार्षिक सोहळ्यात गर्दीमुळे गोंधळ
- ओटीटी प्लॅटफॉर्मवर लागू होणार सेन्सॉरशिप; यूट्यूबवरील पत्रकार, ब्लॉगर्स वृत्तवाहिन्याही कक्षेत येणार