• Download App
    संभाजीराजे म्हणतात, “वादळापूर्वीची शांतता”; नितीन राऊत म्हणातात, “मराठा समाजाने मोठे मन दाखवावे, आमचे भांडवल करून त्यांनी लढू नये!! Maratha reservation vs OBC reservation; MP sambhaji raje and nitin raut tunes differently

    संभाजीराजे म्हणतात, “वादळापूर्वीची शांतता”; नितीन राऊत म्हणातात, “मराठा समाजाने मोठे मन दाखवावे, आमचे भांडवल करून त्यांनी लढू नये!!

    प्रतिनिधी

    कोल्हापूर / अहमदनगर – एकीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यसभेतले खासदार संभाजीराजे छत्रपती राज्याचे ऊर्जामंत्री आक्रमक भूमिका घेऊन वादळापूर्वीची शांतता असे ट्विट करीत असताना काँग्रेसचे नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत हे देखील ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झालेले दिसत आहेत. नगरमध्ये त्यांनी पत्रकारांशी बोलताना मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण याविषयी सविस्तर भूमिका मांडली. Maratha reservation vs OBC reservation; MP sambhaji raje and nitin raut tunes differently

    नितीन राऊत म्हणाले, की ‘मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशीच आमचीही भूमिका आहे. मात्र, त्यांनीही मोठे मन दाखवले पाहिजे. आमचे भांडवल करून त्यांनी स्वत:साठी लढू नये. अन्यथा आम्ही बांगड्या भरल्या नाहीत किंवा आम्ही भिकाराही नाहीत. राज्य घटनेने जे दिले आहे, तेच आम्ही मागत आहोत.

    मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला आमचा पाठिंबाच आहे. कारण स्वातंत्र्यानंतर त्या काळातील मराठ्यांची अवस्था आणि आताची अवस्था यात फार फरक आहे. त्या समाजातही गरीबी वाढली आहे. शिक्षणाचेही प्रश्‍न आहेत. त्यामुळे त्यांना देखील आरक्षणाच्या सवलती मिळाल्या पाहिजे, असे आमचे मत आहे. पण त्यांनी आम्हाला वेठीस धरू नये. आमचे भांड़वल करू नये. तेच काम करू शकतात आणि आम्ही काम करू शकत नाही, अशी भूमिका मराठा समाजाने घेऊ नये. तसे असेल तर आम्हीही बांगड्या भरलेल्या नाहीत. शिवाय आम्ही भिकारीही नाहीत. भारतीय राज्यघटनेने जे अधिकार आम्हाला दिले आहेत, तेच आम्ही मागत आहोत. तो आमचा धर्म आहे, असे नितीन राऊत म्हणाले.

    तिकडे संभाजीराजे यांनी राजर्षि छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळाचा फोटो ट्विट करून त्याला वादळापूर्वीची शांतता असे टायटल दिले आहे. समाज बोलला, आम्ही बोललो. लोकप्रतिनिधींनो तुम्ही बोला आणि जबाबदारी स्वीकारा, असेही त्यांनी ट्विटमध्ये लिहून महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना सूचक इशारा दिला आहे.

    Maratha reservation vs OBC reservation; MP sambhaji raje and nitin raut tunes differently

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ