• Download App
    मराठा आरक्षण बलिदान (आत्महत्या) 80 बांधवांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून प्रत्येकी 10 लाखांची मदत!!|Maratha Reservation Sacrifice (Suicide) 80 Brothers Helped 10 Lakhs Each From Chief Minister's Assistance Fund!!

    मराठा आरक्षण बलिदान (आत्महत्या) 80 बांधवांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून प्रत्येकी 10 लाखांची मदत!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मराठा आरक्षणात बलिदान (आत्महत्या) केलेल्या 80 बांधवांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून प्रत्येकी 10 लाखांची मदत दिल्याची माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून दिली आहे.Maratha Reservation Sacrifice (Suicide) 80 Brothers Helped 10 Lakhs Each From Chief Minister’s Assistance Fund!!

    यात मंगेश चिवटे म्हणतात :

    अर्थातच या अल्पशा मदतीने जीवाची हानी नक्कीच भरून येणार नाही, परंतु घरातील कर्ता माणूस गेल्यानंतर जी पोकळी निर्माण होते, जे कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आलेलं असतं, अशा प्राप्त परिस्थितीत त्यांच्या पश्चात कुटुंबातील सदस्यांना राज्य सरकार आपल्या सोबत असल्याची जाणीव देणारा हा प्रामाणिक प्रयत्न आहे…!!!



    यामध्ये आजपर्यंत 80 मराठा समाज बांधवांच्या कुटुंबातील सदस्यांना प्रत्येकी 10 लक्ष अर्थसहाय्य वितरित करण्यात आलेले आहे. तर 1 सप्टेंबर रोजी झालेल्या लाठीहल्ल्यातील 22 मराठा समाजबांधवाना छत्रपती संभाजीनगर येथील galaxy hospital मध्ये ऍडमिट करण्यात आले होते, त्यांच्याही उपचाराचा खर्च अदा करण्यात आला आहे.

    तसेच, 1 सप्टेंबर रोजी झालेल्या लाठीहल्ल्यात छरे लागलेल्या 3 मराठा समाज बांधवांना मुंबईत लिलावती हॉस्पिटल सर्वोत्तम उपचार करण्यात आले. लिलावती हॉस्पिटल मधील उपचाराचा खर्च तातडीने देण्यास काही तांत्रिक अडचण झाल्याने येथील उपचाराचा संपूर्ण 8 लक्ष खर्च दानशूर आणि संवेदनशील मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी स्वतः उचलला. यासाठी, तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी आणि विद्यमान नवी मुंबई महापालिका उपायुक्त श्री. डॉ. राहुल गेठे यांनी मोलाचे सहकार्य केले.

    महाराष्ट्र शासनाच्या इतिहासात प्रथमच एवढया कमी वेळात मदत वितरित करण्यात आलेली आहे. यासाठी सातत्याने थेट पाठपुरावा करणारे मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील, त्यांचे सहकारी अंतरवली सरपंच श्री. पांडुरंगजी तारख, डॉ. रमेशजी तारख, श्री. श्रीराम कुरूनकर, श्री. बद्रीजी , श्री दत्ता घोडके , श्री. प्रदीप सोळुंके यांचे खरं तर मनःपूर्वक आभार…!!

    तर, प्रशासकीय पातळीवर आम्हाला यासाठी मदत करणारे सर्व जिल्ह्यातील मा. जिल्हाधिकारी महोदय, मा. निवासी उपजिल्हाधिकारी महोदय, मा. तहसीलदार महोदय यांचेही मनःपूर्वक आभार..!!

    सर्वात महत्वाचे राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्री. विकासजी खरगे, अप्पर मुख्य सचिव श्री. भूषण गगराणी, उपसचिव श्री कैलास बिलोणीकर, कक्ष अधिकारी श्रीमती शिल्पा नातू, सहाय्यक संचालक श्री. शिरीष पालव, लेखाधिकारी श्री. खानविलकर, श्रीमती अर्चना गावंड, वैद्यकीय सहायक श्री. डॉ. निलेश देशमुख, श्री. ऋषिकेश देशमुख , श्री स्वरूप काकडे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मधील सर्वच्या सर्व वैद्यकीय सहाय्यक व सर्व टीम आणि यासाठी सहकार्य करणारे ज्ञात – अज्ञात बांधवांचे , लोकप्रतिनिधी यांचे मनःपूर्वक आभार.

    Maratha Reservation Sacrifice (Suicide) 80 Brothers Helped 10 Lakhs Each From Chief Minister’s Assistance Fund!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!