प्रतिनिधी
मुंबई – मराठा आरक्षण रद्द करण्याचा सुप्रिम कोर्टाचा निर्णय आल्यावर त्यावर महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी त्यावर भाष्य केले आहे. या सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाचा फटका गरीब मराठा वर्गाला बसला आहे. गरीब मराठा वर्गाने स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्याऐवजी तो श्रीमंत मराठा वर्गाबरोबर राहिल्याने त्याला हा फटका बसला असल्याची प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. Maratha Reservation; prakash ambedkar blames both rich and poor marathas for supreme court debacle
आंबेडकर म्हणाले, की सुप्रिम कोर्टाचा निर्णय दुर्दैवी आहे. गरीब मराठ्यांवर अन्याय झाला आहे. संपूर्ण मराठा समाज श्रीमंत नाही. त्यांच्यापैकी १० टक्के मराठा समाज श्रीमंत आहे आणि उर्वरित मराठा समाज गरीब आहे. परंतु, या निर्णयासाठी मी गरीब मराठ्यांनाही दोषी धरतो. मराठ्यांच्या विरोधात इथला ओबीसी, आदिवासी नाही, अनुसूचित जातीही नाहीत. गरीब मराठ्यांच्या विरोधात श्रीमंत मराठा आहे. हे अनेकवेळा मी सांगितले आहे. परंतु गरीब मराठा आपली स्वतंत्र ओळख निर्माण करताना दिसत नाही. गरीब मराठा हा श्रीमंत मराठ्यांबरोबरच जातो. त्याचा त्याला या निकालातून फटका बसला आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले…
- ५० टक्के आरक्षण मर्यादेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केलेला आहे. दुसऱ्या माझ्या अंदाजाने मुख्य निकालपत्रात येईल, तो म्हणजे ओबीसी आयोग सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने स्थापन करण्यात आलेला आहे. मी अनेक वेळा म्हणालो आहे की, जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय मान्य करून मराठा आरक्षण त्यामध्ये कसे बसावायचे याचा विचार केला जात नाही, तोपर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही.
- गरीब मराठ्यांना आरक्षणाच्या दिशेने जायचे असेल, तर त्यांनी गरीब मराठा म्हणून ओळख निर्माण केली पाहिजे. ती ओळख निर्माण होत नाही. तोपर्यंत गरीब मराठा सामाजिक दृष्टिकोनातून मागासलेला आहे, असे म्हणता येणार नाही. त्याला आधार द्यायचा म्हटले तर सायमन कमिशनसमोर बाबासाहेबांनी आरक्षणाची मागणी केली होती, त्यात गरीब मराठ्यांचा समावेश केला होता. त्यामुळे श्रीमंत आणि गरीब मराठा ही रेषा स्पष्ट होत नाही, तोपर्यंत गरीब मराठ्यांना ओळख निर्माण करता येणार नाही. श्रीमंत मराठ्यांची ओळख गरीब मराठ्यांची झालेली आहे. शाळा, पतसंस्था, बँका आहेत, हे सगळे सत्ताधारी मराठ्यांकडे आहे, गरीब मराठ्यांकडे काहीही नाही. त्यामुळे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेलो आहोत, हे दाखवता आले, तरच मराठा समाजाला आरक्षण मिळेल.
- महाराष्ट्र सरकारने जो आयोग स्थापन केला हा आयोग केंद्र सरकारशी असणाऱ्या आयोगाशी जुळतोय का? त्याला मान्यता मिळवली आहे का? तर अजिबात नाही. जी गोष्ट सुप्रिम कोर्टाने निर्माण केली, तीच गोष्ट इथल्या सर्वपक्षीय श्रीमंत मराठ्यांनी नाकारली. त्यामुळे गरीब मराठ्यांच्या विरोधात सुप्रिम कोर्टाचा आजचा निकाल आला. गरीब मराठा जोपर्यंत स्वतःची राजकीय ओळख निर्माण करत नाही. आपण श्रीमंत मराठ्यांपेक्षा वेगळे आहोत, असे जोपर्यंत तो दाखवत नाही. तो पर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही.
- पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत गरीब मराठा समाजाला संधी होती. पण, गरीब मराठ्यांनी श्रीमंत मराठ्यांसोबत जाणे स्वीकारले, त्यामुळे गरीब मराठ्याला न्याय कुठेही मिळत नाही. जो गरीब मराठा वर्ग श्रीमंत मराठ्यांसोबत जातोय, त्याला वापरून नंतर दुर्लक्षित केले जात आहे. खोटी आश्वासने दिली जातात.
Maratha Reservation; prakash ambedkar blames both rich and poor marathas for supreme court debacle
महत्वाच्या बातम्या
- मराठा समाज शैक्षणिक, सामाजिक मागास नाही; त्यांना आरक्षित कॅटॅगेरीत आणता येत नाही; सुप्रिम कोर्टाचे परखड मत
- Maratha Aarakahan Result 2021 : मराठा सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय आहेत अशी दुरुस्ती संपुष्टात; सुप्रीम कोर्टाचे निरीक्षण ; वाचा सविस्तर
- BIG BREAKING NEWS : सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द ठरवले; ठाकरे- पवार सरकारला दणका!
- Maratha Reservation Live : मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द ; निर्णय दुर्देवी मात्र संयम राखावा विनोद पाटील