• Download App
    खरे कोण??, खोटे कोण??; मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला अंतर्गतच राजकीय ग्रहण!! Maratha reservation issue fixed in internal fight within community leaders

    खरे कोण??, खोटे कोण??; मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला अंतर्गतच राजकीय ग्रहण!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : खरे कोण??, खोटे कोण??; मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला अंतर्गतच राजकीय ग्रहण!!, अशी अवस्था आता मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर आली आहे. Maratha reservation issue fixed in internal fight within community leaders

    मनोज जरांगे पाटलांच्या उपोषण आंदोलनाचे समर्थन करणाऱ्या माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा जाहीर झाली आहे, त्याचवेळी जिजाऊंचे खरे वंशज कोण?? आणि खोटे वंशज कोण??, याची लढाई मराठा समाजाच्या नेत्यांमध्ये लागली आहे.

    राजमाता जिजाऊंचे वंशज लेखक नामदेवराव जाधव मनोज जरांगे पाटलांचे समर्थक आहेत. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला शरद पवारांचीच छुपी चिथावणी असल्याचे बोलले जाते. पण नामदेवराव जाधव यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवारांना टार्गेट करताच शरद पवारांचे समर्थक नामदेवराव जाधव हेच जिजाऊंचे खोटे वंशज असल्याचे सिद्ध करायच्या मागे लागले आहेत.

    शरद पवारांच्या निवडणूक आयोग असल्या डॉक्युमेंट्स वर त्यांची जात ओबीसी आहे. त्यामुळे ते मराठा नेताच नाहीत. मराठा समाजाची त्यांनी गेली 50 वर्षे फसवणूक केली. शरद पवार हेच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी असल्याचा आरोप त्यांनी केला.

    या पार्श्वभूमीवर शरद पवार समर्थकांनी नामदेवराव जाधव हे जिजाऊंचे वंशज नसल्यास आज “शोध” लावला. राजे लखूजी जाधवांचे प्रा. राजे गोपाल भगवानराव जाधव यांनी आमदार रोहित पवारांना पत्र लिहून नामदेवराव जाधव हे जिजाऊंचे खरे वंशज नसल्याचा दावा केला. रोहित पवारांनी राजे गोपाल भगवानराव जाधव यांचे पत्र व्हायरल करून या संपूर्ण प्रकाराच्या चौकशी आघाडी केली. तशी पोस्ट रोहित पवारांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर लिहिली. नामदेवराव जाधव यांनी शरद पवारांच्या मराठा जाती विषयी शंका घेताच, खुद्द नामदेवरावांच्याच वंशजत्वाविषयी शंका घेतली गेली.

    त्याचवेळी दिवाळीनंतर बीड जिल्ह्यातला मराठा समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला. पण या सर्व लढ्यात खरे कोण?? आणि खोटे कोण??, याचेच राजकीय ग्रहण लागल्याचे दिसून आले.

    Maratha reservation issue fixed in internal fight within community leaders

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना