• Download App
    Maratha Reservation मराठा आरक्षणाची मागणी आणि आंदोलने खूप जुनी

    Maratha Reservation : मराठा आरक्षणाची मागणी आणि आंदोलने खूप जुनी; पण मनोज जरांगेंनी आज साजरी केली वर्षपूर्ती!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Maratha Reservation  महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची मागणी आणि आंदोलने खूप जुनी, पण मनोज जरांगे यांनी आज साजरी केली वर्षपूर्ती!!, हे आज अंतरवली सराटीत घडले. मनोज जरांगे यांनी अंतरवली सराटीतल्या उपोषण स्थळावर जाऊन मराठा आरक्षण आंदोलनाची वर्षपूर्ती साजरी केली. तिथे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. त्यानंतर आपल्या समर्थक मराठा कार्यकर्त्यांची बैठक घेतली.

    वास्तविक मराठा आरक्षणाची मागणी आणि आंदोलने देखील खूप जुनी आहेत. अगदी अण्णासाहेब पाटलांपासूनचा त्याला इतिहास आहे. 1980 च्या दशकात अण्णासाहेबांनी मराठा समाजाची व्यथा ओळखून समाजाला नेतृत्व दिले होते. त्यानंतर 2000 च्या दशकात शालिनीताई पाटील यांनी मराठा आरक्षणाची मागणी लावून धरली होती. विनायक मेटेंनी मोठे आंदोलन उभे केले होते. अनेक मराठा संघटनांनी आंदोलने केली. पण मराठा मुख्यमंत्री आणि मराठा राज्यकर्ते यांनी मराठा आरक्षणाला नकार दिला होता. शरद पवारांनी तर मराठा आरक्षण शक्य नसल्याचे सांगून त्यात 1994 मध्ये कायदेशीर मेख मारून ठेवली. शालिनीताई पाटलांवर कारवाई केली. त्यांचे राजकीय करिअर संपविले.


    J&K Elections : PDPची 17 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, मेहबुबा मुफ्ती विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत


    पण आज मराठा आरक्षण आंदोलनाची वर्षपूर्ती साजरी करणाऱ्या मनोज जरांगे यांच्यामागे पवारांनीच छुपी ताकद उभी केल्याचे उघड गुपित बोलले जात आहे. मनोज जरांगे यांनी अंतरवली सराटीतून वर्षपूर्तीच्या निमित्ताने मराठा समाजाला संदेश दिला. मनोज जरांगे यांनी 29 ऑगस्ट 2023 रोजी पैठण फाटा, शहागड येथे मराठा जनआक्रोश
    मोर्चा आयोजित केला होता. त्या मोर्चाला 1 वर्ष पूर्ण झाल्यावर मनोज जरांगे यांनी संपूर्ण मराठा आरक्षण आंदोलनाला 1 वर्ष पूर्ण झाल्याचे सांगून वर्षपूर्ती साजरी केली. त्यावेळी त्यांनी आपण जातीवादी नसून फक्त आरक्षणवादी आहोत, असा दावा केला.

    यापूर्वी मराठा समाजात एकजूट होत नाही असे बोलले जायचे, पण गेल्या वर्षी 29 ऑगस्ट ही तारीख अशी उजाडली, की समाजाने त्या दिवशी डरकाळी फोडली. त्याचा आवाज सगळ्या महाराष्ट्रात गेला. 29 ऑगस्ट 2023 रोजी सगळा मराठा समाज एकवटला होता. आज त्याची वर्षपूर्ती आहे. कितीही संकटे आली, तरी एकत्रच राहा. कुटुंब एकत्र राहिले, तर कोणी तोडू शकत नाही, असे सांगत मनोज जरांगे यांनी समाज आपल्याच भोवती एकवटल्याचे दाखविले.

    Maratha Reservation celebration by Manoj jarange

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!