मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले.
विशेष प्रतिनिधी
जालना : मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातल्या अंतरवली सराटी गावात उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी आज सतराव्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस घेऊन त्यांनी उपोषण सोडले. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. Maratha Reservation After Manoj Jarange Patil stopped his fast Devendra Fadnavis reaction
फडणवीस म्हणाले, ”मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे तसेच मंत्रिमंडळातील अन्य सहकार्यांच्या उपस्थितीत आज मागे घेतले, ही समाधानाची बाब आहे. मराठा आरक्षणाबाबतीत आम्ही प्रारंभीपासून सातत्याने प्रयत्नरत राहिलो. ते आम्ही दिले आणि हायकोर्टात टिकले सुद्धा. सुप्रीम कोर्टात ते का टिकले नाही, यावर मत व्यक्त करण्याची आज वेळ नाही.”
याचबरोबर ”मात्र, सारथी, छत्रपती राजर्षि शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून उद्योजकतेला प्रोत्साहन, अधिसंख्य पदांची भरती अशा अनेक उपाययोजना अंमलात आणण्यात आल्या. आजही या सर्व बाबतीत अतिशय गतीने काम सुरु आहे. भविष्यात सुद्धा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात मराठा आरक्षण तसेच मराठा समाजाच्या कल्याणकारी योजनांसाठी आमचे सरकार प्रयत्नांची शर्थ करेल.” असंही फडणवीस यांनी सांगितलं.
महाविकास आघाडी ठाकरे पवार सरकारच्या काळात जरांगे पाटलांनी 109 दिवस उपोषण केले होते. मात्र शिंदे – फडणवीस सरकारच्या काळात त्यांना ठोस आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी सतराव्या दिवशी उपोषण सोडले.
दोनदा जीआर काढण्यात आल्यानंतरही आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नव्हता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरांगे पाटील यांच्या आंदोलनस्थळी गेले. मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडवले.
Maratha Reservation After Manoj Jarange Patil stopped his fast Devendra Fadnavis reaction
महत्वाच्या बातम्या
- उज्ज्वला योजनेतून 75 लाख महिलांना मोफत गॅस कनेक्शन; मोदी सरकारची मोठी भेट
- नव्या संसद भवनातून नवभारताचा हुंकार; पण विरोधकांनी चालवलाय सावरकर – मोदींचा फुकट प्रचार!!
- मणिपूरमध्ये सशस्त्र हल्लेखोरांनी पोलीस उपनिरीक्षकाची गोळी झाडून केली हत्या, दोनजण जखमी
- उत्तर प्रदेश : लाचखोर रेल्वे अधिकाऱ्याला CBIने केली अटक, घरात सापडला नोटांचा ढीग, करोडो रुपये जप्त