विशेष प्रतिनिधी
नागपूर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर नेहमीप्रमाणे एकट्या देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत मनोज जरांगे यांनी मजा घेण्याची गुगली टाकली, पण फडणवीसांनी ती चतुराईने एकनाथ शिंदे आणि अजितदादांना बरोबर घेऊन टोलावली. नागपूर मध्ये पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते.
परभणीत मराठा आरक्षण विषयावर बोलताना मनोज जरांगे यांनी नेहमीप्रमाणे एकट्या देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले आत्तापर्यंत दुसऱ्यावर टोलवत होता. आता मी मजा बघतो कसा मराठा आरक्षण देत नाही, आता ते द्यावेच लागेल. ते घेतल्याशिवाय मी सोडतच नाही, असे मनोज जरांगे म्हणाले. आधीच्या सरकार मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी होते. पण आता फडणवीस मुख्यमंत्री आहेत, त्याचा संदर्भ मनोज जरांगे यांनी घेतला होता.
फडणवीसांनी मनोज जरांगे यांच्या वक्तव्यातला खोचकपणा ओळखून अत्यंत चतुराईने त्यांनी टाकलेली गुगली टोलावली. एकतर मराठा आरक्षण हा मजा घेण्याचा विषय नाही. तो मोठ्या समाजाशी संबंधित गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भात एकनाथ शिंदे, अजित पवार आणि मी असे एकत्रच निर्णय घेत होतो, इथून पुढे देखील आम्ही तिघे एकत्र राहूनच निर्णय घेऊ आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत, असा निर्वाळा फडणवीस यांनी दिला.
मराठा आरक्षण या विषयात आपण एकटे पडणार नाही हे फडणवीस यांनी नागपूर मधल्या आपल्या वक्तव्यातून दाखवून दिले.
Maratha Reservation about Jarange : Devendra fadnavis
महत्वाच्या बातम्या
- Governor : माजी केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला मणिपूरचे, तर जनरल व्ही. के. सिंह मिझोरामचे राज्यपाल!!
- छगन भुजबळ ते अभयसिंहराजे भोसले; राष्ट्रवादीतल्या खच्चीकरणाचे किस्से, त्यांच्याच नेत्यांनी चव्हाट्यावर आणले!!
- Lawrence Bishnoi : लॉरेन्स बिश्नोईने आता अमेरिकेत निर्माण केली दहशत!
- Delhi elections : दिल्ली निवडणुकीपूर्वी बांगलादेशी घुसखोरांचे दणादण बनवले जात होते मतदार कार्ड