• Download App
    एकमेकांच्या आरक्षणात घुसखोरीमुळे सलोखा बिघडेल, मराठा - ओबीसी आरक्षणे वेगवेगळी हवीत; प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य!! Maratha - OBC reservations should be different; Statement of Prakash Ambedkar

    एकमेकांच्या आरक्षणात घुसखोरीमुळे सलोखा बिघडेल, मराठा – ओबीसी आरक्षणे वेगवेगळी हवीत; प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य!!

    विशेष प्रतिनिधी

    जालना : एखादी व्यवस्था सेटल झाली असेल, तर अशा शाश्वत होऊन बसलेल्या व्यवस्थेत इतर कोणाला घुसडण्याचा प्रयत्न केला, तर मग सामाजिक सलोखा बिघडेल. त्यामुळे ओबीसी आणि मराठा आरक्षणाची ताटे वेगवेगळीच असली पाहिजेत. मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल, तर त्यांचे ताट हे वेगळे असले पाहिजे, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले. Maratha – OBC reservations should be different; Statement of Prakash Ambedkar

    प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी जालन्यातील वडीगोद्री येथे जाऊन ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी प्राणांतिक उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाके यांची भेट घेतली. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

    प्रकाश आंबेडकर म्हणाले :

    भटक्या विमुक्तांना शाश्वत आरक्षण निघून जाते की काय, याची भीती आहे. याबाबत शासनाने चर्चा केली पाहिजे. राजकीय पक्षांनी, राजकीय पक्षाचे नेत्यांना आपण भूमिका घ्यायला सांगितले पाहिजे. यामधून मार्ग काढला पाहिजे. आम्ही आमची भूमिका अगोदरच स्पष्ट केली आहे. ओबीसी आरक्षणाचे ताट हे वेगळे असले पाहिजे.



    मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्यांचे वेगळे ताट दिले पाहिजे. दोघांना एकमेकांसमोर भिडवत राहणं आणि विधानसभेपर्यंत हे भिडवत राहतील. भाजप संविधान बदलेल, या भीतीने संविधानाच्या बाजूने निकाल लागला. त्यामुळे जनतेचा कल महाविकास आघाडीकडे गेला. संविधानावर ओबीसींनी विश्वास ठेवला. हा सर्वात मोठा आरक्षण वाचवण्याचा भाग असू शकतो, असे मला वाटते.

    मनोज जरांगे यांच्याशी बोलत असताना “सगेसोयरे” शब्द जे ते म्हणत होते, त्याबद्दल मी सल्ला दिला होता. “सगेसोयरे” शब्दाची व्याख्या तुम्ही करून घेतली पाहिजे किंवा कोणाला तरी करून द्यायला पाहिजे, जोपर्यंत व्याख्या काय होते त्यातले नेमकं काय ते कळत नाही.

    – अकोला लोकसभा निवडणुकीत माझ्याकडील मुस्लिम 100 % काँग्रेसकडे गेला आणि तो 100 % काँग्रेसमध्ये गेल्यामुळे मी पडलो. मला ओबीसींची आणि मागासवर्गीयांची मते 2.75 लाख पडतात, ती मला यावेळेसही मिळाली. मुस्लिम समाजाची मते माझ्याकडे आली असती तर मी जिंकलो असतो.

    Maratha – OBC reservations should be different; Statement of Prakash Ambedkar

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस