• Download App
    Maratha morcha मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम उधळण्यावरून सकल मराठा मोर्चा आणि मराठा क्रांती मोर्चात जुंपली; शिवसेना विरुद्ध काँग्रेस वादाची फोडणी!!

    Maratha Morcha : मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम उधळण्यावरून सकल मराठा मोर्चा आणि मराठा क्रांती मोर्चात जुंपली; शिवसेना विरुद्ध काँग्रेस वादाची फोडणी!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा शिंदे – फडणवीस सरकारच्या विरोधात उपोषण सुरू केले असताना मराठा समाजाच्या समन्वयकांमध्ये फूट पडली आहे. सकल मराठा समाजाचे समन्वयक आणि मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाजूला पडून दोन गट आमने सामने आले आहेत. त्याला एकनाथ शिंदे यांची शिवसेना विरुद्ध काँग्रेस वादाची फोडणी मिळाली आहे.

    विशेष म्हणजे मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी आक्रमक झाले असले तरी आता मराठा आंदोलकांमध्ये फूट पडताना दिसत आहे. सकल मराठा समाज मोर्चाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला. इशारा देणारे मुख्यमंत्र्यांना पाय ठेवू देत नाहीत की त्यांचा पाय शरीरावर राहतो ते पाहू, असा आक्रमक पवित्रा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी घेतला. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांना इशारा दिला.


    Ladki Bahin Yojna : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निरंतर चालू राहणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही


    मराठा क्रांती मोर्चाचे अमोल शिंदे म्हणाले :

    मराठा समाजाचा स्वघोषित समन्वयक माऊली पवारने कार्यक्रम उधळून लावण्याच्या इशाऱ्याला आमचा विरोध आहे. मूळात माऊली पवारने लोकसभेला घेतलेले महाविकास आघाडीचे टेंडर विधानसभेत राबवत आहेत. लोकसभेला काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्याकडून माऊली पवारने टेंडर घेतले. मग त्यांनी खासदार झाल्यानंतर मनोज जरांगे भेट घेतली का?? त्यांच्या मागण्या लोकसभेत मांडल्या का??

    – माझं पोलीस प्रशासनाला आवाहन आहे की, कार्यक्रमाच्या दिवशी इशारा देणाऱ्यांना ताब्यात घेऊ नका. कार्यक्रमाच्या गर्दीत त्यांना मोकळे सोडा. मग बघू कोण कोणाला पाय ठेवू देत नाही किंवा यांचा पाय राहतो का, स्वघोषित मराठा समन्वयक माऊली पवारने महाविकास आघाडीचा अजेंडा राबवू नये. माझे माऊली पवारला आव्हान आहे की, त्याने खासदार प्रणिती शिंदेकडून किंवा तिच्या पप्पाकडून लिहून आणावे, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे. त्यांनी जर लिहून दिले तर मग मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून लिहून आणतो.

    Maratha Morcha splits over chief minister eknath shinde program

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस