नाशिक : मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा दुसरा अंक सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने मराठा आरक्षण आंदोलन वाढवत नेऊन त्याला “पवारनिष्ठ वळण” लावण्याचा प्रयोग सुरू झाला आहे आणि त्यातला एक महत्त्वाचा टप्पा म्हणून माळेगाव सहकारी साखर कारखाना बॉयलर प्रदीपनाच्या समारंभात अजित पवारांनी सहभागी होऊ नये म्हणून त्यांच्यावर “बंदी” आणण्याचा मराठा आंदोलन प्रयोग सुरू केला आहे. Maratha kranti morcha bans ajit pawar from coming to malegaon, but will it work politically for sharad pawar??
आतापर्यंत अजित पवारांना बारामती विधानसभा मतदारसंघाच्या कार्यकक्षेत असलेल्या किंवा लोकसभा मतदारसंघाच्या कार्यकक्षेत असलेल्या शहर – गावांमध्ये कधी बंदीला सामोरे जावे लागले नव्हते. पण मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या निमित्ताने हा प्रयोग पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिर्डी दौऱ्याचा नेमका राजकीय मुहूर्त साधून सुरू झाला आहे. हे बारामतीच्या राजकारणातले “डीप स्टेट” आहे.
शिंदे – फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर अजित पवारांनी जवळजवळ महिनाभराने बारामतीला भेट दिली होती. सुमारे 25 ते 30 दिवस ते बारामतीकडे फिरकलेही नव्हते, पण जेव्हा ते बारामतीत आले, तेव्हा बारामतीकरांनी त्यांचा भव्य सत्कार केला होता. त्यांच्यावर जेसीबीतून फुले उधळली होती. त्यांची अभूतपूर्व मिरवणूक काढली होती. त्या सभेतच अजितदादा म्हणाले होते, “माझ्या बायकोने जेवढे माझे मुके घेतले नाहीत, तेवढे बारामतीकरांनी प्रेमाने मुके घेतले.” याचा अर्थ बारामतीकरांनी अजितदादांवर केलेले प्रेम ओसंडून वाहते हे दिसले होते आणि या ओसंडून वाहण्याच्या प्रेमातच त्यांच्या माळेगावच्या “बंदी प्रयोगाची” मुळे दडली आहेत.
अजित पवार बारामतीत येण्यापूर्वी सुप्रिया सुळे यांनी बारामतीचे दौरे सुरू केले होते त्याचबरोबर शरद पवारांचाही बारामती दौरा झाला होता, पण त्यावेळी कोणताही गाजावाजा झाला नाही. सुप्रिया सुळे आणि पवारांचे बारामती दौरे “शांततेत” झाले याची खरी टोचणी आहे!! त्याचे पडसाद माळेगाव “बंदी रुपाने” उमटले आहेत.
बारामतीकरांचे अजित पवारांवरचे प्रेम उघडपणे कमी करता येत नाही हे खरे दुखणे आहे, मग ते प्रेम कमी करायचे तर काय करावे?? यातूनच माळेगावचा “बंदी प्रयोग” समोर आला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी अजित पवारांना माळेगाव सहकारी साखर कारखान्यात बॉयलर प्रदीपनाच्या कार्यक्रमाला येऊ नये म्हणून “बंदी” घातली आहे. ते आले आणि त्यांनी माळेगाव सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी उसाची मोळी टाकली तर आम्ही उग्र आंदोलन करू, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने एकाच वेळी साखर कारखान्याच्या अध्यक्षांना आणि पोलीस स्टेशनला निवेदन देऊन दिला आहे.
अर्थात ही बंदी अजित पवार मानतीलच असे नाही. पण अजित पवारांच्या तब्बल 30-40 वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत हे प्रथम घडते आहेत. याचा नेमका राजकीय अर्थ समजून घेण्याची गरज आहे.
पण त्या पलीकडे जाऊन अजित पवारांवर अशी “बंदी” लादून ती त्यांनी मानलीच नाही किंवा उग्र आंदोलन झाले, तर अजित पवार आणि अजित पवारांचे समर्थक त्याचा प्रतिकार करणारच नाहीत असे का समजले जाते??, हा खरा प्रश्न आहे. किंबहुना अशी “बंदी” लादून आपले राजकारण साध्य करता येईल, असे अजितदादांच्या विरोधकांना का वाटते??, हाही प्रश्न आहे.
कारण बारामतीत अजितदादांनी विणलेले राजकीय जाळे तुटणे इतके सोपे नाही. एक-दोन कार्यक्रमांवर “बंदी” लादली तर ती पुढे तशी लादता येईलच असे नाही. किंबहुना अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांकडून मात्र वेगळा राजकीय जमालगोटा मिळाल्याशिवाय राहणार नाही, हे अजितदादांच्या एकूण कार्यशैलीवरून सांगता येऊ शकेल.
राष्ट्रवादी काँग्रेस मधले 40 आमदार घेऊन अजित पवार हे शिंदे – फडणवीस सरकार मध्ये सामील झाले, त्यावेळी शरद पवारांनी अतिशय राजकीय चतुराई दाखवून अजित पवारांच्या विरोधात कारवाई करण्यापेक्षा छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्यासारखी सॉफ्ट टार्गेट सुरुवातीला निवडली होती. पण अजित पवारांनी शरद पवार जिथे सभा घेतील तिथे आपण उत्तर सभा घेऊ, असे म्हटल्याबरोबर पवारांच्या सभा थंडावल्याची वस्तुस्थिती महाराष्ट्राने पाहिली.
अशा स्थितीत अजितदादांना माळेगाव कारखान्यावर येण्यास “बंदी” घालणे आणि अजितदादा ती “बंदी” मुकाटपणे ऐकून घेतील आणि ते प्रतिकारच करणार नाहीत ही शक्यता गृहीत धरणे रास्त तरी आहे का??, हा मूलभूत प्रश्न आहे आणि इथेच बारामतीच्या पुढच्या राजकारणातली मोदी – अजितदादा कॉम्बिनेशन फॅक्टरची मेख दडली आहे!!
Maratha kranti morcha bans ajit pawar from coming to malegaon, but will it work politically for sharad pawar??
महत्वाच्या बातम्या
- मल्लिकार्जुन खरगे यांचा दावा- पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका काँग्रेस जिंकणार; मध्य प्रदेशात लोकांना सीएम शिवराज यांची अडचण!
- ड्रग्स माफिया ललित पाटील ठाकरेंचा शिवसैनिक; तर सलमान फाळके, शानू पठाणचे सुप्रिया सुळे, आव्हाडांबरोबर फोटो!!
- ”इंडिया आघाडीत पंतप्रधान पदासाठी १८ उमेदवार इच्छुक, प्रत्येक पक्षाला हवंय आपल्या नेत्यासाठी पंतप्रधानपद”