• Download App
    24 जानेवारीला तज्ज्ञ वकिलांची फौज कोर्टात बाजू मांडणार, मराठा समाजाला न्याय मिळेल, मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही Maratha community will get justice, says Chief Minister Shinde

    24 जानेवारीला तज्ज्ञ वकिलांची फौज कोर्टात बाजू मांडणार, मराठा समाजाला न्याय मिळेल, मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी 20 जानेवारीला मुंबईत आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार असल्याचे जाहीर केले आहे. तर आरक्षण घेतल्याशिवाय परतणार नसल्याचा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की क्युरेटिव्ह पिटीशनमुळे सुप्रीम कोर्टात मराठा समाजाला न्याय मिळेल असे मला वाटते, असे त्यांनी म्हटले आहे. Maratha community will get justice, says Chief Minister Shinde

    आताच सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाला आहे. क्युरेटिव्ह पिटीशन 24 जानेवारीला कोर्ट ऐकणार आहे. ही याचिका फेटाळेल असे म्हटले जात होते. पण सुप्रीम कोर्ट हे ऐकणार आहे, त्यामुळे मराठा समाजासाठी मोठा दिलासा आहे. 24 जानेवारीला वकिलांची तज्ज्ञ फौज बाजू मांडेल, मराठा समाज मागास कसा आहे हे सांगेल, परिस्थिती सांगेल. सुप्रीम कोर्टाने ज्या त्रुटी मांडल्या होत्या, त्या दूर कऱण्याचे काम वकिलांची फौज करेल. मला वाटते मराठा सामाजाला न्याय मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

    दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, मागच्या सरकारने मविआ सरकारने सुप्रीम कोर्टात मराठा समाजाला मागास ठरवण्यासाठी जे पुरावे द्यायला हवे होते ते मांडले नव्हते. पण यावेळी निष्णात वकिलांची फौज बाजू मांडेल. तोपर्यंत सर्वांनी शांतता राखणे आवश्यक आहे. कायदा सुव्यवस्थता, शांतता राहिली पाहिजे, सर्व जाती धर्मांना माझे आवाहन आहे, सर्वांनी संयम राखावा, मराठा समाजाला नक्की न्याय मिळेल. क्युरेटिव्ह पीटिशन ऐकली जाणे ही जमेची बाब आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही सर्वांची इच्छा आहे, सत्ताधारी, विरोधक, आंदोलक सर्वांना वाटते मराठा आरक्षण मिळावे ही सर्वांची इच्छा आहे. सुप्रीम कोर्टात आम्ही बाजू मांडू, सर्वांनी शांतता राखावी.

    मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून अवघा महाराष्ट्र पेटवणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी आता मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. जरांगे यांची शनिवारी बीडमध्ये मराठा आरक्षणाची निर्णायक इशारा सभा पार पडली. त्यात त्यांनी 20 जानेवारी रोजी मुंबईला धडकण्याची घोषणा केली. मराठा समाजाने 20 तारखेला मुंबईच्या दिशेने कूच करून शांततेत उपोषण करावे. या प्रकरणी समाजाच्या कोणत्याही संघटनेने वेगळी चूल मांडण्याची गरज नाही, असे ते म्हणाले.

    Maratha community will get justice, says Chief Minister Shinde

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Thakckrey brothers म्हणे, महाराष्ट्राच्या हितासाठी टाळी आणि हाळी; खरंतर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वासाठी हात मिळवायची तयारी!!