• Download App
    Maratha community, find out the real caste of Ashok Kharat; Prakash Ambedkar's demand to the Chief Minister!! मराठा समाजातल्या गुन्हेगारांना वाचविण्याचा प्रयत्न, अशोक खरातची खरी जात शोधा; प्रकाश आंबेडकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी!!

    मराठा समाजातल्या गुन्हेगारांना वाचविण्याचा प्रयत्न, अशोक खरातची खरी जात शोधा; प्रकाश आंबेडकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी!!

     विशेष प्रतिनिधी

    नाशिक : मराठा समाजातल्या गुन्हेगारांना वाचविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे अशोक खरातची खरी जात शोधा. तो मराठा आहे की अन्य जातीचा आहे, हे सगळ्या महाराष्ट्राला कळू द्या, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.Maratha community, find out the real caste of Ashok Kharat; Prakash Ambedkar’s demand to the Chief Minister!!

    प्रकाश आंबेडकरांनी सविस्तर ट्विट करून अशोक खरात याच्या जातीविषयी शंका व्यक्त केली. त्याचवेळी त्यांनी मराठा समाजातल्या गुन्हेगारांना वाचविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात असल्याचा गंभीर आरोप केला. अशोक खरात याच्याशी संबंध आलेल्या प्रत्येकाची चौकशी करण्याची मागणी सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी केली.



    प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या गंभीर आरोपामुळे महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. कारण प्रकाश आंबेडकर यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्याने थेट जातीचा उल्लेख करून गुन्हेगाराची पार्श्वभूमी तपासायची मागणी केल्याने अशोक खरातच्या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे.

    – प्रकाश आंबेडकरांचे ट्विट असे :

    भोंदू अशोक खरातच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी आणि या प्रकरणाची सत्यता जपण्यासाठी त्याला उच्च सुरक्षा व्यवस्थेखाली ठेवण्यात यावे.

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी मागणी करतो की, अशोक खरात हा मराठा समाजाचा आहे की दुसऱ्या जातीचा, याची चौकशी करण्याचे आदेश द्यावेत.

    अशोक खरातशी मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे. मराठा समाजातील गुन्हेगारांना जाणीवपूर्वक वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

    Maratha community, find out the real caste of Ashok Kharat; Prakash Ambedkar’s demand to the Chief Minister!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Aditi Tatkare : बॅनरवरून आमची निष्ठा ठरू नये; अजितदादा आणि सुनेत्रा काकींचे स्थान अढळ, दिलगिरी व्यक्त करत अदिती तटकरेंचा विरोधकांना टोला

    Rohit Pawar : अजित पवारांचे फोटो बॅनरवरून गायब; रोहित पवारांची तटकरेंवर टीका, म्हणाले – बटाईदाराने सातबारा स्वतःच्या नावावर करण्याचा प्रकार

    SBI and HDFC Slide : टॉप-10 कंपन्यांपैकी 7 कंपन्यांचे मूल्य ₹1.75 लाख कोटींनी घटले; रिलायन्स टॉप लूझर ठरली, मूल्य ₹89 हजार कोटींनी घटले