विशेष प्रतिनिधी
नागपूर : कडवा कम्युनिस्ट असल्याने धर्मच नाकारणारा नक्षल चळवळीचा मास्टरमाईंड प्रा. साईबाबा याने चक्क आईच्या वर्षश्राध्दासाठी पॅरोलची मागणी केली आहे. मात्र, हे कारण नियमात बसत नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पॅरोल नाकारला आहे.Maoist Saibaba seeks Parol for mothers yearly rituals
बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेला नक्षल चळवळीचा मास्टर माइंड प्रा. गोकलकोंडा नागा साईबाबा ऊर्फ जी. एन. साईबाबा याने आईच्या वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमाकरिता ४५ दिवसाची अकस्मात अभिवचन रजा (पॅरोल) मिळावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.
यापूर्वी त्याने या रजेसाठी विभागीय आयुक्तांकडे अर्ज सादर केला होता. संबंधित नियमात बसत नसल्याच्या कारणावरून तो अर्ज नामंजूर करण्यात आला. परिणामी, त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. साईबाबा ९० टक्के दिव्यांग असून, तो दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक होता. तेथून तो नक्षल चळवळ चालवित होता.
या प्रकरणी ७ मार्च २०१७ रोजी गडचिरोली सत्र न्यायालयाने साईबाबा व त्याच्या साथीदारांना दहशतवादी कृत्याचा कट रचणे, दहशतवादी संघटनेला सहकार्य करणे, दहशतवादी संघटनेसाठी कार्य करणे इत्यादी गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवून, जन्मठेप व अन्य विविध प्रकारची शिक्षा सुनावली. त्या निर्णयाविरुद्ध साईबाबाने उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे. ते अपील प्रलंबित आहे.
Maoist Saibaba seeks Parol for mothers yearly rituals
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रापाठोपाठ झारखंडमध्येही कॉँग्रेस आमदार बंडाच्य पावित्र्यात, आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांवर नाराज
- अमेरिकेत परदेशी नागरिकांच्या व्हिसा नियमात शिथिलता आणण्यासाठी विधेयक सादर ; सहकुटुंब रोजगाराचे दालन खुले होणार
- जयपूरमध्ये लिंबाची किंमत ४०० रुपये किलो; एका दिवसांत ६० रुपयांनी वाढली किंमत
- सिल्वर ओकवर दगड – चप्पल फेक : एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्तेंना घरात घुसून पोलिसांनी घेतले ताब्यात!!