विशेष प्रतिनिधी
मुंबई : काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार विजय पाटील विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदाच्या खुर्चीवर विराजमान झाले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी वडेट्टीवारांच्या नावाची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना विरोधी पक्षनेते पदाच्या आसनावर निवडून बसविले. यानंतर या सर्व नेत्यांनी वडेट्टीवारांच्या नेतृत्व कौशल्याची वाखाणणी करणारी भाषणे केली. Many speeches in praise of Leader of Opposition Vadettivar
पण विरोधी पक्षनेतेपदी विराजमान झाल्यानंतर विजय वडेट्टीवार यांचे आता खरे कौशल्य आणि कसोटी महाराष्ट्र काँग्रेस विधिमंडळ पक्ष अखंड टिकवण्यात लागणार आहे. वडेट्टीवार विदर्भातले फायर ब्रँड नेते मानले जातात ते मूळचे शिवसैनिक आहेत. याचा उल्लेख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणात आला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी देखील वडेट्टीवार यांची स्तुती केली.
पण वडेट्टीवार यांच्यावर काँग्रेस विधिमंडळ पक्ष अखंड टिकून ठेवण्याची फार मोठी जबाबदारी येऊन पडली आहे.
महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्ष नेत्याचा इतिहासच त्याची साक्ष देतो. नारायण राणे विरोधी पक्षनेते होते. विलासराव देशमुख यांच्या काळात ते सत्ताधारी पक्षात जाऊन महसूल मंत्री झाले. अजित पवार विरोधी पक्ष नेते होते. ते शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळात येऊन उपमुख्यमंत्री झाले. त्यावेळी दोघांचेही अनुक्रमे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटले.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत कसे होणार तिकीट वाटप? अजितदादांनी सांगितला फॉर्म्युला
आता काँग्रेस पक्ष फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे किंबहुना तशा बातम्या महाराष्ट्राच्या राजकीय हवेत पसरत आहेत. अशोक चव्हाणांपासून अनेकांची नावे त्यासाठी अनेकजण घेत आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेतृत्वाची देखील महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी एखाद्या नेत्याची निवड करणे ही कसोटीच होती. ती कसोटी काँग्रेस नेतृत्वाने विजय वडेट्टीवार यांची निवड करून पूर्ण केली आहे आणि आता वडेट्टीवार यांच्यावर राष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्ष टिकवून ठेवण्याची जबाबदारी येऊन पडली आहे.
महाराष्ट्रात काँग्रेसचे 44 आमदार आहेत. यापैकी 24 आमदार फुटण्याची दाट शक्यता बोलली जात आहे. काँग्रेस मधून 24 आमदार फुटले तर त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होणार नाही. शिवाय त्यांना सत्तेचे लाभही मिळू शकतात. या पार्श्वभूमीवर येत्या 10 ते 11 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रात फार मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता अंतर्गत गोटातून वर्तवली आहे.
आता ते प्रत्यक्ष तसेच घडेल किंवा काय हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पण या दरम्यान विजय वडेट्टीवार यांची कसोटी मात्र काँग्रेस विधिमंडळ पक्ष अखंड टिकून ठेवण्याची राहणार आहे हे मात्र निश्चित!!
Many speeches in praise of Leader of Opposition Vadettivar
महत्वाच्या बातम्या
- हे काय करून बसलास मित्रा? नितीन देसाई यांच्या आत्महत्या नंतर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिची भावुक पोस्ट
- लवासा लेक सिटीत डार्विन ग्रुप उभारणार पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अतिभव्य पुतळा!!
- ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेअंतर्गत देशभरातील १ हजार ३०९ स्थानके विकसित केली जाणार
- Haryana Violence : नूहमध्ये ५ ऑगस्टपर्यंत इंटरनेट बंद, मानेसर-सोहनासह गुडगावच्या या भागात निर्बंध