विशेष प्रतिनिधी
पुणे : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरचीआई मनोरमा खेडकर यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली. मनोरमा खेडकर यांचे मुळशीतल्या स्थानिक शेतकऱ्यांना धमकावतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. Manorama Khedkar, who was detained from Mahad, brought to Pune
पुणे पोलिसांशी देखील त्यांनी हुज्जत घातली होती. गेल्या काही दिवसांपासून मनोरमा खेडकरचा तपास पोलिस करत होते. आज अखेर पोलिसांनी मनोरमा खेडकरला महाड मधील हॉटेल मधून अटक केली आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करुन पोलिस त्यांना पुण्याला घेऊन येत आहेत. मनोरमा खेडकर हॉटेलमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याबरोबर पोलिसांचे एक पथक पहाटे हॉटेलवर पोहोचले आणि तिथून त्यांनी मनोरमा खेडकर यांना ताब्यात घेतले.
पोलिसांची तीन पथके त्या ठिकाणी शोध घेत होती. पूजा खेडकरच्या बाणेर येथील बंगल्यावर जाऊन पोलिसांनी मनोरमा खेडकर असल्याची पाहणी केली होती. त्यावेळी तिने पोलिसांना दाद दिली नव्हती. नंतर घराच्या गेटवरती कुलूप लावल्याचं निर्दशनास आलं होतं. फोन देखील बंद असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर पोलिसांची ३ पथकं मनोरमा खेडकर यांच्यासह इतरांचा शोध घेत होते. आज अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना ताब्यात घेऊन पुण्याला आणले.
अनेक दिवसांपासून मनोरमा खेडकरचा शोध पोलिसांकडून सुरू होता. खेडकरांच्या घराबाहेर नोटिस देखील लावण्यात आली होती. पुणे ग्रामीण पोलिसांचं पथक मनोरमा खेडकरला घेऊन पुण्याच्या दिशेने रवाना झालं आहे. महाडमधील एका हॉटेलमध्ये मनोरमा खेडकर लपून बसल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. त्यानंतर आज पहाटेच्या सुमारास पोलिसांचं पथक हॉटेलवरती दाखल झालं त्यानंतर मनरमा खेडकर यांना अटक करण्यात आली.
शेतकऱ्याला पिस्तूल दाखवून धमकावल्या प्रकरणी मनोरमा खेडकर यांच्याविरुद्ध पौड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून पौड पोलिसांचं एक पथक बाणेर रस्त्यावर असलेल्या खेडकर यांच्या घराची पाहणी करून गेलं होतं. खेडकर कुटुंबाकडून कुठलाही प्रतिसाद न दिल्यानं पोलिस निघून गेले होते. मनोरमा खेडकरने बंदुकीने शेतकऱ्यांना धमकावण्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर पौड पोलिसांनी मनोरमा खेडकरसह काही जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पौड पोलिस यासंदर्भात मनोरमा खेडकरची चौकशी करण्यासाठी आले होते. पण त्यांच्या घरी कुणीही नसल्याने पोलिस परत गेले. त्यानंतर मनोरमा खेडकर गायब झाल्याची माहिती समोर आली होती. आज त्यांना महाडमधून पुणे पोलिसांनी अटक केली.
शेतकऱ्याला पिस्तुल दाखवून दमदाटी केल्याप्रकरणी मनोरमा खेडकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी घराला कुलूप असल्याने फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण फोनही लागत नसल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. तसेच खेडकर कुटुंबाच्या पुणे आणि आजूबाजूला असणाऱ्या फार्म हाऊसवर देखील पुणे पोलिसांनी शोध घेतला होता.
Manorama Khedkar, who was detained from Mahad, brought to Pune
महत्वाच्या बातम्या
- ट्रम्प यांच्या समर्थनासाठी पुढे आले भारतवंशी रामास्वामी- निक्की हेली; ते राष्ट्राध्यक्ष असताना पुतिन यांनी युक्रेनवर हल्ला केला नव्हता!
- श्रीलंका अंडर-19 क्रिकेटच्या माजी कर्णधाराची हत्या; घरात घुसून झाडली गोळी
- पवारांच्या भरवशावर उभा राहिलेले शेकापचे उमेदवार पडल्यामुळे काँग्रेस 7 आमदारांवर “कठोर” कारवाई करेल का??
- अग्निवीर योजनेवर काँग्रेसची आगपाखड; पण हरियाणात अग्निवीरांवर सवलतींचा वर्षाव!!