• Download App
    मनोज जरांगेंची नाहक बदनामी; शिवबा संघटनेचे वकील वाजिद खान, म्हस्के पाटलांनी बाजू लावून धरली!!|Manoj Jarang's blatant defamation; Lawyers of Shivba organization Wajid Khan, Mhaske Patal took sides!!

    मनोज जरांगेंची नाहक बदनामी; शिवबा संघटनेचे वकील वाजिद खान, म्हस्के पाटलांनी बाजू लावून धरली!!

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : मनोज जरांगे यांची दिवसेंदिवस वाढत चाललेली लोकप्रियता काही लोकांना सहन होईना म्हणूनच त्यांची नाहक बदनामी करण्याचे प्रकार सुरू झाले, अशा शब्दांमध्ये शिवबा संघटनेचे वकील एडवोकेट वाजिद खान बीडकर आणि एडवोकेट गणेश म्हस्के पाटील यांनी आज पत्रकार परिषद बाजू लावून धरली.Manoj Jarang’s blatant defamation; Lawyers of Shivba organization Wajid Khan, Mhaske Patal took sides!!

    गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये मनोज जरांगे यांच्याच आंदोलनात सामील असलेल्या नामदेवराव जाधव, अजय महाराज बारस्कर संगीता वानखेडे, बाबूराव वाळेकर यांनी जरांगे यांच्यावर वेगवेगळ्या विषयांवर आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. खुद्द जरांगे यांनी शिवराळ भाषा वापरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले. त्यानंतर शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षातल्या नेत्यांनी पुढे येऊन जरांगेंवर जोरदार हल्लाबोल केला होता.



    या पार्श्वभूमीवर जरांगे यांना बॅकफूटवर जावे लागले. आज त्यांना आमरण उपोषण आंदोलन स्थगित करावे लागले. या पार्श्वभूमीवर शिवबा संघटनेचे वकील एडवोकेट वाजिद खान बीडकर आणि एडवोकेट गणेश म्हस्के पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन जरांगे यांची बाजू लावून धरली.

    मनोज जरांगे यांची दिवसेंदिवस वाढत चाललेली लोकप्रियता काही लोकांना सहन होत नाही म्हणूनच जरांगेंवर बिनबुडाचे आरोप होत आहेत. जरांगे यांनी समाजासाठी मोठा त्याग केला. त्यांचे योगदान विसरता येणार नाही. सत्ताधारी पक्षातील राजकीय मंडळी काही लोकांना हाताशी धरून पाटील यांची बदनामी करत आहेत, असे दोन्ही वकील म्हणाले.

    बीड शहरात चार तरुणांनी पत्रकार परिषद घेऊन जरांगे यांच्यावर खोटे आरोप केले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कटुंबातील सदस्यांचे ते कार्यकर्ते असुन सोशल मीडीयावर देखील त्यांचे फोटो दिसून येतील, असा दावा वाजिद खान बीडकर आणि गणेश म्हस्के पाटील यांनी केला.

    कोपर्डी प्रकरणातील आरोपींना कोर्टात मारहाण केलेल्या तरूणांनी पत्रकार परिषद घेऊन जरांगे यांनी काही मदत न केल्याचे आरोप केले होते, या आरोपावरून जरांगे यांच्या शिवबा संघटनेतील वकीलांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आरोपांचे खंडन केले.

    गणेश म्हस्के पाटील म्हणाले, 2017 मध्ये कोपर्डी येथे एका मुलीवर अत्याचार झाला. त्या आरोपींना कोर्टाच्या बाहेर मारण्यासाठी जरांगे जाणार होते, परंतु इतर सदस्यांनी जावू दिले नाही. मात्र या चार तरूणांनी जास्त बळजबरी केली आणि त्यांनी आरोपींना कोर्टाच्या बाहेर मारहाण केली. या तरूणांना जोपर्यंत जामीन मिळाला नाही तोपर्यंत जरांगे घरी गेले नाहीत.

    याच तरुणांनी तीन महिन्यांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन जरांगे यांचे कौतुक केले होते आणि आता अचानक भूमिका बदलली. काही लोकांचे मन दुखावले की तो लगेच जरांगे यांच्या विरोधात बोलतो. जरांगे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा शरद पवार यांच्याशी काही सबंध नाहीत, असा दावाही वकिलांनी केला.

    जरांगे यांच्या विरोधात ज्या तरुणांनी पत्रकार परिषद घेतली त्यांना जेल मधून बाहेर काढण्यासाठी आम्ही आणि जरांगे यांनी दिवसरात्र कष्ट घेतले. जरांगे यांच्या विरोधात बोलण्यासाठी आम्हाला अनेक फोन येत असून वेळ आल्यावर पुराव्यांसह ते बाहेर काढू, असा इशाराही या दोन्ही वकिलांनी दिला आहे.

    Manoj Jarang’s blatant defamation; Lawyers of Shivba organization Wajid Khan, Mhaske Patal took sides!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस