नाशिक : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभेचे भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी काल रात्री उशिरा मनोज जरांगे यांची अंतर्वली सराटी मध्ये जाऊन भेट घेतली. त्यांच्याशी मराठा आरक्षण मुद्द्यावर चर्चा केली. मनोज जरांगे यांनी अशोक चव्हाण यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांना आपल्या तक्रारी सांगितल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा युवकांवर खोटे गुन्हे दाखल करत असल्याच्या तक्रारी केल्या, पण यातून मनोज जरांगे यांनी सत्तेशी जुळवून घेण्याच्या नव्या वाटाच शोधून काढल्याचे दिसून आले. फडणवीस यांना ठोका चव्हाण यांना भेटा सत्तेशी जुळवून घेण्याच्या “नव्या वाटा” हेच मनोज जरांगे यांचे आणि त्यानिमित्ताने मराठा समाजाचे धोरण असल्याचे स्पष्ट झाले. Manoj jarange’s new politics, target fadnavis but soft on BJP power!!
महाराष्ट्रातला मराठा समाज कायम सत्तेशी संलग्न राहिला सत्ता हातातून निसटत असल्याचे दिसून येतात मराठा समाजाच्या पुढाऱ्यांनी आपला पाला बदलला, पण पाला बदलून तेच सत्तेशी संलग्न राहिले. सत्तेशी जुळवून घेत राहिले. हे अगदी यशवंतराव चव्हाण – इंदिरा गांधी, शरद पवार – राजीव गांधी यांच्या काळापासून महाराष्ट्रात घडत राहिले. यशवंतराव आणि पवारांचा केंद्रीय सत्तेशी संघर्ष केल्याचा इतिहास नाही. कारण तेवढे त्यांची क्षमताच नव्हती. ते कायम केंद्रीय सत्तेशी जुळवून घेतच सत्तेच्या वळचणीला बसले. त्याचेच पुढचे “प्रकरण” सध्या उलगडत चालले आहे.
अशोक चव्हाण जरी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले असले तरी मराठा आरक्षण या विषयावर या विषयाशी त्यांचे कनेक्शन जुने आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री असताना ते त्या विषयाशी संबंधित असलेल्या समितीचे अध्यक्ष होते मनोज जरांगे पाटलांचा आंदोलनाचा मराठवाड्यातला प्रभाव लक्षात घेऊन अशोक चव्हाण यांनी मनोज जरांगे यांचे अंतर्वली सराटी मध्ये जाऊन भेट घेतली. त्यांच्याशी सुमारे दीड तास चर्चा केली काल रात्री 11.30 वाजता अशोक चव्हाण अंतर्वली सराटीत पोहोचले. 11.30 ते 1.00 अशी जरांगे – चव्हाण चर्चा झाली. त्यामध्ये अशोक चव्हाण यांनी जरांगेंचे सगळे मुद्दे ऐकून घेतले. कुणबी नोंदी, निजामी कागद वगैरे मुद्दे जरांगेंनी मांडले, पण त्याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा कायम ठेवला. तुम्हाला सुट्टी नाही वगैरे भाषा वापरली. मराठा आंदोलकांवरचे गुन्हे फडणवीसांनी लादले. ते गुन्हे मागे घेत नाहीत, अशा तक्रारी मनोज जरांगे यांनी केल्या. अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणाविषयी आणि मनोज जरांगे यांच्या भूमिकेविषयी सकारात्मक भूमिका घेत आपण सरकारचे प्रतिनिधी म्हणून नाही, तर मराठा समाजाचा घटक म्हणून भेटायला आले असल्याचे स्पष्ट केले.
पण या सगळ्यातून सत्ताधारी भाजपला लोकसभा निवडणुकीचे “सेफ गेम” करता यावा, ही अशोक चव्हाण यांची अंतस्थ भूमिका राहिली, तर देवेंद्र फडणवीसांवर साधलेल्या शरसंधानानंतर देखील आपल्याला भाजपशी कुठल्या ना कुठल्या मार्गाने जुळवून घ्यावेच लागेल, याची जाणीव मनोज जरांगेंना झाल्याने त्यांनी अशोक चव्हाणांची मराठा समाजातला घटक म्हणून भेट घेतली. हे संघर्षाचे नव्हेत, तर मराठा समाजाला सत्तेशी संलग्न ठेवण्याचे सगळे प्रयत्न आहेत.
Manoj jarange’s new politics, target fadnavis but soft on BJP power!!
महत्वाच्या बातम्या
- DRPPL : धारावी पुनर्विकास सर्वेक्षण सुरू होण्याच्या आदल्या दिवशी राहुल गांधींची धारावीत जाऊन अदानींविरुद्ध चिथावणी!!
- भारताने UN मध्ये ‘इस्लामफोबिया’च्या ठरावावर मतदानापासून राखले अंतर
- आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि ओडिशामध्ये १९ एप्रिलपासून विधानसभा निवडणुका
- निवडणूक कार्यक्रमाच्या घोषणेवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…