विशेष प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आजपासून अंतरवालीत आमरण उपोषण सुरू केले. सातारा संस्थानचा जीआर काढा. गॅझेटरनुसार अर्ज करणाऱ्याला प्रमाणपत्र द्या, व्हॅलिडीटी द्या, नाही दिली तर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असा आदेश काढावा, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली. कायद्याच्या आणि संविधानाच्या कक्षेत राहून मनोज जरांगेंच्या सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याची तयारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखविली.
– सरकार सकारात्मक
सरकार मराठा आरक्षणाबाबात सकारात्मक आहे. सरकारची भूमिका पारदर्शक आहे. आम्ही सकारात्मक काम करणारे लोक आहे. आम्ही समाजांना एकमेकांनासमोर आणून भांडत नाही, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. तसेच आम्ही समाजाच्या हिताचे निर्णय घेतो. परंतु, त्याचवेळी संविधान आणि न्ययालयाच्या निर्णयाच्या आधीन राहून निर्णय घेतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
– ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही
एका समाजाचा काढून दुसऱ्या समाजाला द्यायचा असं कधीही केलं नाही, ओबीसी समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही, मराठा समाजाचाही त्या ठिकाणी समाधान करून देण्याकरिता सगळे निर्णय घेऊ परंतु ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होऊ देणार नाही. आता चर्चा झालेली आहे पुन्हा एकदा सांगतो न्यायालय, कायदा आणि संविधान याच्या चौकटीत बसून कोणताही निर्णय घेण्यास तयार आहोत, असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले.
– मनोज जरांगे काय म्हणाले?
मराठा समाज मोठा होऊ नये, असा विचार असणाऱ्यांची संख्या जास्त आहे. कितीही चांगला जीआर काढला तरी त्याला आव्हान दिलं जातं. सातारा संस्थानचा जीआर काढा. गॅझेटरनुसार अर्ज करणाऱ्याला प्रमाणपत्र द्या, व्हॅलिडीटी द्या नाही दिली तर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असा आदेश काढावा, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली. गुन्हे मागे घेण्यासाठी सरकारला अधिकार आहे, ते कलम कमी करू शकतात, बलिदान देणाऱ्या कुटुंबाचा निधी आणि नोकरीचा विषय आहे. मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करण्याचा एक विषय आहे, असंही मनोज जरांगे म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्याय देण्याच्या भूमिकेत यावे. एकदा याच ठिकाणी आम्ही आमच्या आई-बहिणींना रक्ताच्या थारोळ्यात पाहिले.. पुन्हा असा विचार करु नका. पोलीस लाठीचार्जच्या भानगडीत पडू नका. राज्यात तुम्हाला जड जाईल, असं मनोज जरांगेंनी सांगितले. आडवं बोलत नाही, सरकारला पट्ट्यावर घेत नाही आणि पुन्हा आंदोलन थांबणार नाही, असं इशारा मनोज जरांगेंनी दिला. संवाद करून गोडी बोलाविणे मार्ग काढा. हल्ला करायचा नाही, मराठा शांत आहे. देवेंद्र फडणवीस आता दुसऱ्या वेळी हल्ला करणार नाहीत. तरीही मी बोलून दाखवले, असं मनोज जरांगे म्हणाले.
– मनोज जरांगे यांच्या 10 मागण्या
– मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना 29 मे च्या आता कुणबी प्रमाणपत्र द्या.
– सातारा, कोल्हापूर, औंध आणि पुणे, मिरज संस्थांचा GR काढा. 1994 च्या धर्तीवरच GR काढा.
– महाराष्ट्रातील सर्व सरसकट गुन्हे मागे घ्या.
– आंदोलनात बलिदान देणाऱ्या कुटुंबीयांना महावितरण आणि MIDC मध्ये नोकरीचा GR काढा.
– सारथीच्या सर्व योजना पुन्हा सुरू करा.
– महामंडळाचे सर्व परतावे ताबडतोब वाटप केले पाहिजे.
– कुणबी प्रमाणपत्र दिलेले त्याची व्हॉलिडिटी द्या.
– मराठा उपसमिती काही कामाची नाही, अध्यक्षाला काम नाही. उपसमिती बरखास्त करा.
– स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा.
– शिंदे समितीला मुदतवाढ देऊन रेकॉर्ड तपासायला लावा.
Manoj Jarange’s hunger strike begins
महत्वाच्या बातम्या
- पिंपरी-चिंचवड आणि पुण्यासाठी जलसंधारणाच्या दिशेने मोठे पाऊल; दोन्ही ठिकाणच्या विशेष पथकाला फडणवीस सरकारची मंजुरी
- राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सत्तेच्या तुकड्यासाठी भांडणे; शिंदे सेनेचे मराठवाड्यात पक्षप्रवेश सोहळे!!
- AI च्या क्षेत्रात गुंतवणुकीसाठी सध्या सर्वोत्तम काळ आणि संधी; AI क्षेत्रात नेतृत्वासाठी महाराष्ट्र सज्ज!!- मुंबई टेक वीक २०२६ चे उद्घाटन
- Amit Shah : ‘घुसखोरांना शोधून भारताबाहेर पाठवणार’; अमित शहांचा मोठा इशारा, सीमासुरक्षेवर केंद्र सरकार अधिक आक्रमक