• Download App
    288 उभे करण्याची भाषा करणाऱ्या जरांगेंचे प्रत्यक्षातले टार्गेट 40 - 50, म्हणजे पवारांसारखे डबल डिजिटच; पण...!!Manoj jarange's aim is double digit like sharad pawar only!!

    288 उभे करण्याची भाषा करणाऱ्या जरांगेंचे प्रत्यक्षातले टार्गेट 40 – 50, म्हणजे पवारांसारखे डबल डिजिटच; पण…!!

    नाशिक : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत 288 उमेदवार उभे करण्याची भाषा करणाऱ्या मनोज जरांगे यांचे प्रत्यक्षातले टार्गेट 40 – 50 म्हणजे डबल डिजिट असल्याचे खुद्द त्यांच्याच तोंडून बाहेर आले. अंतरवली सराटीत उपोषण सोडण्यापूर्वी जरांगे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांच्यावर आगपाखड केली. उपोषण संपू द्या, मग एकेकाकडे बघतो, असे ते म्हणाले, पण त्याच वेळी 288 उमेदवार विधानसभा निवडणुकीसाठी उभे करण्याचीही भाषा केली. पण प्रत्यक्षातले त्यांचे टार्गेट मात्र 40 – 50 आमदार निवडून आणण्याचेच असल्याचे त्यांच्या तोंडून बाहेर आले. Manoj jarange’s aim is double digit like sharad pawar only!!

    आपलाही आवाज विधानसभेत पोहोचला पाहिजे. मराठा, धनगर, ओबीसी सगळ्या समाजांना न्याय देणारा आवाज विधानसभेत असेल तर उपयोग आहे. आपले निदान 40 – 50 तरी आले पाहिजेत ना!! म्हणजे आपला आवाज निदान विधानसभेत पोहोचला जाईल. नाहीतर आपण ज्यांना सांगतो आणि निवडून आणतो, ते आमदार आपला आवाज विधानसभेत पोहोचवत नाहीत, असे मनोज जरांगे म्हणाले.

    मनोज जरांगे यांच्या या वक्तव्यामुळे त्यांचे टार्गेट मराठा समाजाच्या आरक्षणापेक्षा डबल डिजिट आमदार निवडून आणायचे असल्याचे स्पष्ट झाले. याबाबतीत मनोज जरांगे आणि शरद पवार यांच्यातले राजकीय साम्य देखील उघड झाले.

    जरांगे – पवार साम्य!!

    शरद पवारांची संपूर्ण कारकीर्द आधी महाराष्ट्राचा नेता म्हणून आणि नंतर राष्ट्रीय पातळीवरचा नेता म्हणून त्यांचे नेते आणि कार्यकर्ते गाजवत राहिले, पण प्रत्यक्षात शरद पवारांची राजकीय क्षमता फक्त सिंगल डिजिट खासदार आणि डबल डिजिट आमदार निवडून आणण्याची राहिली. तसेच मनोज जरांगे यांच्या बाबतीत घडताना दिसत आहे.

    मराठा आरक्षणाच्या निमित्ताने मनोज जरांगे यांनी स्वतःला संपूर्ण मराठा समाजाचा नेता म्हणून महाराष्ट्रासमोर आणले. सगळा मराठा समाज आपल्या पाठीशी असल्याचा दावा केला. त्याचवेळी विधानसभेच्या 288 जागांवर उमेदवार उभे करण्याची भाषा केली, परंतु प्रत्यक्षात 40 – 50 आमदार निवडून आले पाहिजेत, असे स्वतःच्या तोंडाने सांगून त्यांनी आपल्या सगळे समाजकारण आणि राजकारण शरद पवारांसारखे डबल डिजिटच आहे, असे सिद्ध करून दाखविले.

    288 उभे करणे अवघड!!

    तसेही महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात 288 उमेदवार उभे करण्याची तोंडी भाषा करणे निराळे आणि प्रत्यक्ष तेवढे उमेदवार उभे करणे निराळे!! अखंड काँग्रेस सारख्या पक्षालाच जे फार कमी वेळा जमू शकले, ते सध्याच्या सगळ्यात मोठ्या भाजप सारख्या पक्षालाही अजून जमवता आलेले नाही. महाराष्ट्र भाजपला देखील 288 जागांवर उमेदवार देता आलेले नाहीत.

    शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अखंड असताना देखील या दोन्ही पक्षांना महाराष्ट्रात एकदम 200 जागाही कधी लढवता आलेल्या नाहीत. कारण 200 सक्षम उमेदवार उभे करणे ही बाब सोपी नाही. त्यासाठी राजकीय संघटन संपूर्ण महाराष्ट्रभर खोलवर रुजावे लागेल. निवडणूक लढविण्याची क्षमता असणारी माणसे तयार करावी लागतील, याची जाणीव शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वांना होती आणि आहे. त्यामुळे त्यांनी कधीच 288 ची भाषा केली नाही. आपला मर्यादित वकूब माहिती असल्याने एकमेकांना धरून राहून ते सध्या आपले राजकारण साधू पाहात आहेत.

    काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या महाराष्ट्रात रुजलेल्या पक्षांच्या तुलनेत मनोज जरांगे हे तर फारच नवखे आहेत. त्यातही ते “स्वयंभू” नाहीत. शरद पवारांचा अदृश्य हात जरांगे यांच्या पाठीशी असल्याचे उघड गुपित सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. म्हणूनच जरांगे यांनी 288 उमेदवार उभे करण्याची तोंडी भाषा केली असली, तरी प्रत्यक्षात आमदार निवडून आणायची रेंज 40 – 50 च ठेवली आहे. ही शरद पवारांसारखी चतुराई आहे.

    … पण मूळात मनोज जरांगे यांनी म्हटल्याप्रमाणे ते 288 उमेदवार उभे करतील??, की तुतारी वाजविणाऱ्या पक्षाला उमेदवारांचा पुरवठा करतील??, हा सगळ्यात कळीचा मुद्दा आणि प्रश्न आहे. कारण तसेही मनोज जरांगे यांचे आंदोलन फुटलेल्या राष्ट्रवादीला कार्यकर्त्यांचा इंधन पुरवठा करण्यासाठीच होते ना!!, मग त्यातून काही निवडक “सक्षम” उमेदवारांचा पुरवठा ते “तुतारी”ला करतील, की स्वतःच पक्ष काढून किंवा अपक्ष उमेदवार उभे करतील??

    Manoj jarange’s aim is double digit like sharad pawar only!!

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!