• Download App
    Manoj Jarange मनोज जरांगेंनी घेतली तुतारीची सुपारी, सगळ्या महाराष्ट्राला समजली; लक्ष्मण हाकेंची सेंधमारी!!

    Manoj Jarange मनोज जरांगेंनी घेतली तुतारीची सुपारी, सगळ्या महाराष्ट्राला समजली; लक्ष्मण हाकेंची सेंधमारी!!

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : मनोज जरांगे यांनी घेतली तुतारीची सुपारी, ती सगळ्या महाराष्ट्राला समजली, अशा शब्दांमध्ये ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी आज मनोज जरांगे यांच्यावर शरसंधान साधले. मनोज जरांगे यांनी 15 मतदारसंघांची नावे घेऊन उमेदवार निवडून आणा आणि पाडा, असे आवाहन केले, ते बहुसंख्य मतदारसंघ मराठवाड्यातलेच निघाले. या पार्श्वभूमीवर जरांगे नुसता लांडगा आला करतात. त्यांनी तुतारीची सुपारी घेऊन वाजवायला सुरुवात केली आहे, असे टीकास्त्र लक्ष्मण हाके यांनी सोडले.

    मनोज जरांगे आज निर्णय जाहीर करणार. ते महाराष्ट्रामध्ये 150 पेक्षा जास्त उमेदवार उभे करणार. तशी यादीच ते पत्रकार परिषदेत सांगणार वगैरे घोषणा गेले काही दिवस प्रसार माध्यमांमधून ते करत होते. परंतु, प्रत्यक्षात मनोज जरांगे यांनी आज मराठवाड्यातल्या 15 मतदारसंघांची यादी देऊन त्यातले उमेदवार निवडून आणा आणि पाडा. ज्यांनी ज्यांनी मराठ्यांना त्रास दिलाय, त्यांना निवडणुकीत पाडून बदला घ्या, असे आवाहन केले.

    या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके यांनी जरांगेंच्या यादीचे वाभाडे काढले. जे रात्रीचे जाऊन मनोज जरांगे यांना भेटले, त्यांच्या विरोधात मनोज जरांगे यांनी उमेदवार दिलेले नाहीत. ते उमेदवार जाहीरही करणार नाहीत. मनोज जरांगे यांनी तुतारीची सुपारी घेतली आहे. त्यांना रोहित पवार, राजेश टोपे वगैरे नेते नियमित भेटत होते. शरद पवार देखील त्यांना भेटले होतेच. त्यामुळेच ओबीसी आरक्षणात घुसून मनोज जरांगे यांना मराठा आरक्षण पाहिजे, ही भूमिका त्यांनी घेतली. हा तुतारीची सुपारी घेण्याचाच प्रकार आहे, असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला.


    RPI Athwale group सतत डावलले जात असल्याने‎ रिपाइं (आठवले गट) नाराज, महायुतीचा प्रचार करणार नसल्याची भूमिका


    मनोज जरांगे नावाचे वटवाघुळ महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसले आहे, ते उद्या दुपारी 3.00 वाजता म्हणजेच उमेदवार माघारी घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर इतिहासजमा होईल, अशा प्रखर शब्दांचा प्रहार लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर केला.

    ओबीसी आरक्षणावर हल्ला करणाऱ्या उमेदवारांना पाडा. अशी उमेदवारांची यादी आम्ही देखील जाहीर करणार आहोत. ती 15 – 20 उमेदवारांची यादी नसेल, तर 100 पेक्षा जास्त उमेदवारांची यादी असेल, असे लक्ष्मण हाके म्हणाले.

    Manoj Jarange with Tutari Sharad pawar said by Laxman hake

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    सायबर फसवणुकीविरुद्ध राज्याची सज्जता : जागतिक दर्जाची लॅब्स, त्वरित प्रतिसाद आणि व्यापक जनजागृती

    Arun Lad : पुणे पदवीधर मतदारसंघात राजकीय खेळी ; शरद लाड यांचा भाजप प्रवेश ?

    संघ शताब्दी : पुणे महानगरात 57 संचलने, 23,218 तरुणांचा सहभाग; संविधान रक्षणाचा निर्धार!!