विशेष प्रतिनिधी
मुंबई : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाची गुंतागुंत जातीय वळणावर गेली असून या प्रकरणांमध्ये आता मनोज जरांगे यांची एन्ट्री झाली आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील मुख्य संशयित वाल्मीक कराड अद्याप फरार आहे. त्याच्या अटकेच्या मागणीसाठी बीड जिल्ह्यात 28 डिसेंबर रोजी सर्वपक्षीय मोर्चा निघणार आहे. त्या मोर्चामध्ये मनोज जरांगे सामील होणार आहेत. पण त्यापूर्वी उद्या मनोज जरांगे मस्साजोगा येथे येऊन संतोष देशमुखच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. त्याचबरोबर ते परभणी मध्ये जाऊन सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबीयांची देखील भेट घेणार आहेत.
संतोष देशमुख हत्याकांडातील प्रमुख संशयित वाल्मीक कराड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यातील आर्थिक संबंधांपासून ते वैयक्तिक संबंधांपर्यंतच्या सर्व बाबी आता सोशल मीडियातून उघडकीस आल्या आहेत. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देखील धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांची एन्ट्री एकूणच प्रकरणातील गुंतागुंत वाढवण्याची शक्यता आहे.
Manoj Jarange warns sarpanch santosh deshmukh in beed
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal अजितदादांनी भूमिका मांडल्यानंतरही भुजबळांनी पुन्हा काढले अजितदादांच्या राजकीय नियोजनाचे वाभाडे!!
- Bangladeshis : दिल्लीत अवैध बांगलादेशींना पकडण्यासाठी ऑपरेशन
- Pune book festival : वाचन प्रेमींकडून २५ लाख पुस्तकांची खरेदी ; ४० कोटींपेक्षा अधिक रुपयांची उलाढाल
- Kejriwal दिल्लीची निवडणूक जिंकली तरी केजरीवाल खुर्ची पासून दूरच; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा!!