विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे यांनी दिली हाक नव्या परिवर्तनाची; एकाच खात्यात 2 – 2 दोन मंत्री आणि 7 – 8 उपमुख्यमंत्री करायची चालवली तयारी!!
मनोज जरांगे यांनी आज मौलाना सज्जाद नोमानी आणि आनंदराज आंबेडकर यांच्या बरोबर पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रात मराठा, मुस्लिम आणि दलित एकत्र आल्याची घोषणा केली. त्याचवेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करून महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांनाही घरी घालवण्याची प्रतिज्ञा केली. गेल्या 70 वर्षात घडले नाही, ते आता घडते आहे. मराठा, मुस्लिम, दलित सगळे एकत्र येत आहेत. तुम्ही कोणी नाराज राहू नका. नाराज असाल, तर सोडून द्या. कुणी शिव्या दिल्या तर धाकट्या भावाने आपल्याला शिव्या दिल्या, असे म्हणून पुढे चला. तुम्ही सगळे सावध राहा. इच्छुकांनी जास्त ताणून धरू नये. आपल्याला पुढे मोठे परिवर्तन करायचे आहे. या परिवर्तनात एकाच खात्यात 2 – 2 मंत्री करू. मराठा, मुस्लिम, धनगर, ओबीसी, दलित असे 7 – 8 उपमुख्यमंत्री करू. बाकीची मंत्रीपदे, महामंडळे, जिल्हा परिषदा, मार्केट कमिट्या वगैरे आहेतच. सगळ्यांना सत्तेचा वाटा देऊ, असे मनोज जरांगे म्हणाले.
पूर्वी आपल्याला सभेसाठी 100 एकर जागा पुरायची नाही. आता तर मराठा, मुस्लिम, दलित एकत्र आल्यावर 500 एकर जागा पुरणार नाही. 100 किलोमीटर पर्यंत ट्रॅफिक जाम झाला पाहिजे अशी गर्दी करू, अशी ही पुस्ती जरांगे यांनी जोडली.
मात्र महाराष्ट्रात नेमके किती उमेदवार उभे करणार??, ते कोणत्या मतदारसंघात उभे करणार??, ज्यांनी फॉर्म भरलेत त्यापैकी किती जणांना नेमका पाठिंबा देणार आहे??, याविषयीचा निर्णय मात्र जरांगे यांनी आज जाहीर केला नाही. तो 3 नोव्हेंबर पर्यंत पुढे ढकलला. आता अंतरवली सराटी मध्ये कोणी येऊ नका. तिथे गर्दी करू नका. आम्हाला निर्णय घेऊ द्या. 3 तारखेला निर्णय जाहीर करू. त्याआधी ओबीसी आणि बाकीच्या समाजाशीही बोलू, असे जरांगे यांनी स्पष्ट केले.
Manoj Jarange to make 7 – 8 dy. Chief ministers in maharashtra
महत्वाच्या बातम्या
- BJP : पवारांनी केली अजितदादांच्या राष्ट्रवादीची फोडाफोडी, पण भाजपची मित्र पक्षांना उमेदवार पुरवठादारी मोठी!!
- Uddhav Thackeray : पवारांनी ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदात खोडा घातला, तर ठाकरे कशाला सुप्रियांच्या मुख्यमंत्री पदाला पाठिंबा देतील??
- Ayodhya : अयोध्येत दीपोत्सवाद्वारे रचले गेले दोन विश्वविक्रम!
- Deepotsav 2024 : 25 लाख दिव्यांनी श्रीरामाची अयोध्या सजली; लक्ष लक्ष दीपांनी भारतीय सीमाही उजळली!!