विशेष प्रतिनिधी
जालना : मनोज जरांगे यांनी सहाव्यांदा उपोषणाचे हत्यार उपसल्यानंतर त्यांची तब्ब्येत खालवली आहे. यामुळे महाराष्ट्रातल्या तिसऱ्या आघाडीत सामील झालेल्या स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे अंतरवली सराटीमध्ये पोहचल. यावेळी त्यांनी सरकार बरोबरच विरोधकांवरही जोरदार निशाणा साधला.
संभाजीराजे यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात आपले वडील शाहू महाराज यांचा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारीचा प्रचार केला होता. त्यावेळी त्यांनी आपली स्वराज्य संघटना थोडी बाजूला ठेवली होती. शाहू महाराज कोल्हापूर मधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर मात्र संभाजीराजे यांनी भूमिका बदलली आणि ते राजू शेट्टी बच्चू कडू यांच्याबरोबर तिसऱ्या आघाडीत म्हणजेच परिवर्तन महाशक्तीत सामील झाले. मनोज जरांगे यांना या तिसऱ्या आघाडीत सामील करून घेण्याचे संभाजीराजे यांच्या सकट सगळ्या नेत्यांचे प्रयत्न आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणूनच मनोज जरांगे यांची तब्येत खालावल्याचे समजतात संभाजीराजे तातडीने अंतरवाली सराटीत पोहोचले.
तिथे मनोज जरांगे यांची भेट घेतल्यानंतर संभाजीराजे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यात त्यांनी महायुती सरकार बरोबरच महाविकास आघाडीतील विरोधी पक्षांवरही निशाणा साधला. विरोधी पक्षातील नेतेही बघ्याची भूमिका घेत आहेत. हे चालणार नाही. निर्णय घ्या. हो की नाही बोलून टाका, असा इशारा संभाजीराजे यांनी दिला.
संभाजीराजे म्हणाले :
मनोज जरांगे हे या वर्षात सहाव्यांदा आंदोलन आणि आमरण उपोषणाला बसले आहेत. राज्यातील इतिहासातील शरमेची बाब आहे. एक व्यक्ती समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जीवाची बाजी लावायला बसला आहे. त्याची दखल किंबहूना त्यावरचा निर्णय या सरकारने घेतलेला नाही. मी डॉक्टर्सकडून सर्व रिपोर्ट घेतले. परवा रायगडवर मी गेलो होतो. त्यावेळी मला कळलं की मनोज जरांगे यांची तब्येत खालावली आहे. त्यामुळे मी त्यांना पाहण्यासाठी प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलो आहे. त्यांचा जीव तुमच्यासाठी आहे. त्यांचा जीव महत्त्वाचा आहे. त्यामुळे मी त्यांना पाहायला आलोय. मला दु:खी वाटतं. वेदना होत आहे. एवढी तब्येत खालावूनही… आता तर त्यांनी सलाईन घ्यायचं बंद केलं आहे. सरकार निवांत मुंबईत एअर कंडिन्शन्स ऑफिसात बसले आहेत.
विरोधी पक्षातील नेतेही बघ्याची भूमिका घेत आहेत. हे चालणार नाही. हे तुमचं कॅबिनेट आहे ना… घ्याना निर्णय मग. हो की नाही बोलून टाका. ही काय पद्धत आहे. इथले मेडिकल रिपोर्ट जातात तिकडे. मेडिकल रिपोर्ट वाईट आहेत. काही होऊ शकतं. त्याला तुम्ही जबाबदार असणार आहात. मनोज जरांगेंना काय सांगायचं ते सांगितलं. तब्येतीच्या बाबत चर्चा झाली. त्यांनी मला शब्दही दिलाय. मी सरकार आणि विरोधकांना जबाबदार धरतो. पहिलं सरकारला आणि नंतर विरोधी पक्षांना. तुम्ही एकत्र या आणि आरक्षण द्यायचं की नाही ते ठरवा.
मी सरकारला सांगू इच्छितो की, ज्या शाहू महाराजांनी आरक्षण दिलं होतं, त्यात मराठा समाजाचा समावेश होता. तुम्ही फुले शाहू शिवाजी आंबेडकरांचं नाव घेता, तर मराठ्यांना आरक्षण द्या. मी पूर्वी जरांगेंसोबत होतो. आजही आहे. उद्याही राहीन. आज बऱ्याच गोष्टी मी बोलू शकतो. पण मला फोकस हलवायचा नाही. तुम्हाला जराही गांभीर्य नसेल तर सत्तेत राहून तुमचा उपयोग काय??
विरोधी पक्षातील नेत्यांना सांगायचं वर्षभरापूर्वी पटापट आले. आता कुठे आहात?? राजकारणाची वेळ आली, विधानसभा निवडणूक आली म्हणून जरांगे नकोय का?? मराठा समाज नको का?? बहुजन समाज नको का?? हे अजिबात चालणार नाही.
Third front leader Sambhjiraje meet manoj jarange
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde : देशाचे पॉवर हाऊस होण्याची महाराष्ट्रात ताकद; मुख्यमंत्र्यांचा आत्मविश्वास
- Gas explosion : कोळसा खाणीत गॅसचा स्फोट; 28 कामगार ठार, 17 हून अधिक जखमी
- Awadhesh Prasads : अयोध्येतून मोठी बातमी, सपा खासदार अवधेश प्रसाद यांच्या मुलाविरोधात गंभीर गुन्हे दाखल
- Mallikarjun Kharge : मल्लिकार्जुन खरगे म्हणाले- जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा देऊ, काँग्रेस जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करेल