• Download App
    Manoj jarange जरांगेंच्या मुख्यमंत्रीपदाची वाजवली हलगी

    Manoj jarange : जरांगेंच्या मुख्यमंत्रीपदाची वाजवली हलगी; तिसऱ्या आघाडीचे घोडे पुढे दामटायची तयारी, की “मास्टर माईंड”ची वेगळीच खेळी??

    कोणत्याही परिस्थितीत देवेंद्र फडणवीस यांचा पराभवच करायचाच, या जिद्दीने मराठा आरक्षण आंदोलन करणारे नेते मनोज जरांगे यांची मुख्यमंत्री पदाची तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांनी परस्पर हलगी वाजवली, पण यातून फक्त आघाडीचे निदान डबल डिजिट तरी आमदार निवडून यावेत, याचीच तयारी हे नेते करत असल्याचे चित्र निर्माण झाले. त्या पलीकडे जरांगे यांनी उभ्या केलेल्या राजकीय ताकदीचा खुद्द त्यांना कुठला वापरच करायचा शिल्लक राहू नये, अशी व्यवस्था किंवा राष्ट्रवादीतल्या परिभाषेतला “करेक्ट कार्यक्रम” तिसऱ्या आघाडीने चालविल्याचे दिसून येत आहे. Manoj jarange, third front candidature of CM post, a game of mastermind!!

    मनोज जरांगे हेच आमचे म्हणजे परिवर्तन महाशक्तीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील, असे राजरत्न आंबेडकर यांनी जरांगे यांना न विचारताच परस्पर जाहीर करून टाकले. त्या घोषणेला खुद्द जरांगे यांनी मान्यता दिली की नाही हे देखील सांगण्याची तसदी राजरत्न आंबेडकरांनी घेतली नाही. पण म्हणून जरांगेंची उमेदवारी जाहीर करण्यामागचा तिसऱ्या आघाडीचा इरादा काही लपून राहिला नाही. तो उघड व्हायचा, तो झालाच!!

    – मर्यादित कुवतीचे नेते

    तसेही तिसऱ्या आघाडीकडे संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी, बच्चू कडू, वामनराव चटप, शंकर अण्णा धोंडगे हे नेते राज्यभरातल्या राजकारणातल्या चर्चेतले आहेत, पण त्यांच्या राजकीय कुवती देखील फारच मर्यादित आहेत. किंबहुना आपापल्या मतदारसंघांपुरते किंवा फार तर क्षेत्रापुरते ती “दादा” मंडळी आहेत. त्यापलीकडे मते खेचण्याचा त्यांचा कुठलाही राजकीय प्रभाव नाही, हे अनेक निवडणुकांमध्ये सिद्ध झाले आहे. Manoj jarange

    संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्ष संघटनेला विधानसभा निवडणुकीपूर्वी जरी मान्यता मिळाली असली, तरी हीच स्वराज्य पक्ष संघटना त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी गुंडाळून ठेवून काँग्रेसचा प्रचार केला होता आणि शाहू महाराजांच्या खासदारकीला हातभार लावला होता, हा फार जुना नाही, तर ताजा इतिहास आहे. आता हेच संभाजीराजे महाराष्ट्र स्वराज्य पक्षासह तिसऱ्या आघाडीत सामील झालेत. पण लोकसभा निवडणुकीतला त्यांचा इतिहास पाहता त्यांच्या तिसऱ्या आघाडीतल्या विश्वासार्हतेविषयीच संशय निर्माण झाला आहे. Manoj jarange

    त्यामुळे मूळात तिसऱ्या आघाडीकडे संपूर्ण महाराष्ट्रव्यापी आवाहन करू शकेल आणि मते खेचून आणू शकेल, असा नेताच नाही. त्यामुळे मनोज जरांगे जर आयते आपल्या हाताला लागले, तर त्यांनाच मुख्यमंत्री पदाचे उमेदवार जाहीर करून त्यांच्या लोकप्रियतेचा जो काही होईल, तो फायदा तिसऱ्या आघाडीला करून घ्यायचा या नेत्यांचा इरादा असल्यास त्यात नवल नाही. Manoj jarange

    – जरांगे स्वतःचे “मालक” उरलेत का??

    पण ही सगळी झाली तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांची एकतर्फी बाजू. खुद्द मनोज जरांगे यांनी तिसऱ्या आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाच्या ऑफरवर कुठली अद्याप तरी परवानगी दिलेली नाही. शिवाय आज जरांगे यांच्या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर मराठा समाज उतरला असला, तरी खुद्द जरांगे हे काही राजकीय दृष्ट्या “स्वतःचे” “मालक” शिल्लक उरल्याचे चित्र दिसत नाही. कारण त्यांचे मूळात “मास्टर माईंडच” वेगळे आहेत, हे “उघड गुपित” सगळ्या महाराष्ट्राला माहिती झाले आहे.

    आता जरांगे जर स्वतःच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार होणार असतील किंवा त्यांना तिसरी आघाडी त्या घोड्यावर बसवणार असेल, तर जरांगे यांच्या आंदोलनाला सर्व प्रकारचा “इंधन पुरवठा” करून आपला लाभ काय काय झाला??, असा विचार जर “मास्टर माईंड”ने केला, तर त्यात काही चूक म्हणायचे कारण नाही. अर्थात तसा काही विचार करूनच “मास्टर माईंड”ने काही खेळी केली असेल आणि त्यातूनच तिसऱ्या आघाडीतल्या नेत्यांनी जरांगे यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केले असेल, तर आगामी काळात त्याचे “वेगळेच” परिणाम सगळ्या महाराष्ट्राला पाहायला मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. एवढेच आत्तापुरते म्हणता येईल.

    Manoj jarange, third front candidature of CM post, a game of mastermind!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Thakckrey brothers म्हणे, महाराष्ट्राच्या हितासाठी टाळी आणि हाळी; खरंतर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वासाठी हात मिळवायची तयारी!!