विशेष प्रतिनिधी
जालना: Manoj Jarange : बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटच्या आधारे अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक झाला आहे. या मागणीसाठी बंजारा समाजाने जालना आणि बीड येथे आज भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. दरम्यान, हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे यांनी बंजारा समाजाच्या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे.
जर मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटच्या आधारे ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिले जात असेल, तर त्याच गॅझेटच्या आधारावर बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, अशी मागणी बंजारा समाजाकडून करण्यात येत आहे. हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती (एसटी) म्हणून उल्लेख असल्याचा दावा बंजारा समाजाकडून केला जात आहे. या मागणीसाठी बंजारा समाजाने आज जालना आणि बीड येथे भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे.
मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करून आरक्षण दिल्याप्रमाणे बंजारा समाजालाही या गॅझेटच्या आधारे अनुसूचित जमाती प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी बंजारा समाजाने केली आहे. हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश होऊ शकतो, त्यामुळे सरकारने तातडीने याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी बंजारा समाजाचे धर्मगुरू जितेंद्र महाराज यांनी हिंगोली येथे केली होती. तसेच, सरकारने याबाबत निर्णय न घेतल्यास राज्यातील लाखो बंजारा बांधव रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला होता. हिंगोली येथे बंजारा आणि सी समाजाची संयुक्त बैठक घेऊन याबाबत घोषणा करण्यात आली होती.
आज बंजारा समाजाने बीड आणि जालना येथे भव्य मोर्चाचे आयोजन केले. या मोर्चात लाखो बंजारा बांधव सहभागी झाले. बंजारा समाजातील नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही या आंदोलनाच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. या मागणीसाठी एका तरुणाने आत्महत्या केल्याची दु:खद घटनाही घडली आहे. दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे. ते म्हणाले, “जर हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाचा एसटी म्हणून उल्लेख असेल, तर त्यांना एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे. त्यांच्या या मागणीला आमचा पूर्ण पाठिंबा आहे.”
मराठा आणि ओबीसी यांच्या आंदोलनाची धग काहीशी शांत झाली असताना आता इतर समाजांनीही आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलने सुरू केली आहेत. बंजारा आणि धनगर समाजानेही एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे या सर्व आंदोलनांवर सरकार काय निर्णय घेते आणि ही आंदोलने शांत करण्यासाठी सरकार कशा प्रकारे प्रयत्न करते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
Manoj Jarange supports the Banjara community’s movement
महत्वाच्या बातम्या
- Sushila Karki : सुशीला कार्की नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान; राष्ट्रपतींनी 6 महिन्यांत निवडणुका घेण्याची घोषणा केली
- ट्रम्प टेरिफच्या अतिरेकामुळे अमेरिकेत महागाईचा कहर; भारतात GST कमी केल्याने स्वस्ताईची लहर!!
- Haribhau Rathod : मराठा आरक्षणावरून हरिभाऊ राठोड संतापले- आम्ही ओबीसी येडे आहोत का? भुजबळ एका समाजापुरतेच मर्यादित
- Suresh Dhas advice to the Hake : आक्रमकपणे बोलून प्रश्न सुटत नसतात; आक्रस्ताळेपणा बंद करा ! सुरेश धस यांचा हाकेंना सल्ला