प्रतिनिधी
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाच्या दिशेने निघाले आहेत. 24 ऑक्टोबर पर्यंत शिंदे फडणवीस सरकारने मराठा आरक्षण जाहीर केले नाही तर 25 ऑक्टोबर पासून पुन्हा एकदा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे. Manoj Jarange Patil towards hunger strike again
मनोज जरांगे यांनी राज्यात विविध ठिकाणी जाहीर सभा घेत आक्रमक भूमिका घेतली आहे. 24 ऑक्टोबरपर्यंत सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्याव, अन्यथा तीव्र उपोषण केलं जाईल, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. यावेळी त्यांनी आंदोलनाची पुढील रुपरेषा काय असेल? याचीही घोषणा केली आहे.
“मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून २५ ऑक्टोबरपासून आमरण उपोषण पुन्हा सुरू करणार आहे. त्या उपोषणादरम्यान, कुठलेही औषधोपचार किंवा वैद्यकीय सेवा घेणार नाही. अन्न आणि पाण्याचाही त्याग करीन. मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून २५ तारखेपासून एकदम कठोर उपोषण करेन. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत आमच्या गावात कोणत्याही राजकीय नेत्याला येऊ देणार नाही. आरक्षण घेऊनच गावात यायचे, नाहीतर आमच्या गावच्या सीमेलाही तुम्हाला शिवू देणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.
प्रत्येक सर्कलमधील सर्व गावांच्या वतीने एकाच ठिकाणी महाराष्ट्रभर ताकदीने साखळी उपोषण सुरू करणार आहे. 28 तारखेपासून या साखळी उपोषणाचे आमरण उपोषणात रुपांतर होणार आहे. याची सर्कलनिहाय तयारी मराठा समाजाने केली आहे. सगळ्या गावांनी सर्कलच्या ठिकाणी किंवा मोठं गाव असेल तर त्याठिकाणी आसपासच्या गावातील सर्व लोकांनी एकत्र येत कायमस्वरेपी बसून राहायचे आहे, अशा सूचना मनोज जरांगे यांनी दिल्या आहेत.
मनोज जरांगे पुढे म्हणाले, “प्रत्येक तालुक्यात आणि गावात प्रचंड संख्येनं मराठा समाजाने एकत्र येत सरकारला जागं करण्यासाठी कँडल मार्च काढायचा आहे. हे शांततेत सुरू झालेले आंदोलन सरकारला झेपणार नाही. 25 ऑक्टोबरला पुन्हा आंदोलनाची नवी दिशा सांगणार आहे. मात्र सरकारने ही गोष्ट गांभीर्याने घ्यावी. हे आमरण उपोषण आणि सर्कलचे साखळी उपोषण महाराष्ट्रातले 5 कोटी मराठे चालविणार आहेत. सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न 24 तारखेच्या आत मार्गी लावावा. 25 तारखेला पुन्हा आंदोलनाची दिशा सांगितली जाणार आहे. ती तुम्हाला पेलणारी नसेल.
Manoj Jarange Patil towards hunger strike again
महत्वाच्या बातम्या
- महुआ मोईत्रा वादापासून TMCने राखले अंतर; म्हटले- जो वादात अडकला, त्यानेच बोलावे; निशिकांत दुबे यांची लोकपालकडे तक्रार
- भारताचा मोस्ट वॉन्टेड लष्कर-ए-जब्बारचा संस्थापक दाऊद मलिक पाकिस्तानात ठार
- खासदार महुआ मोईत्रांच्या लाचखोरीतून प्रश्न घोटाळ्यातून तृणमूळ काँग्रेसने झटकले हात!!
- महुआ मोईत्राच्या अडचणी वाढण्याची चिन्हं! लोकसभा अध्यक्षांनंतर आता निशिकांत दुबे यांनी केली लोकपालकडे तक्रार