विशेष प्रतिनिधी
नांदेड : Lakshman Hake मनोज जरांगे पाटील यांनी दिल्लीला नाही तर अमेरिकेला जावे. शासनाने त्यांना तिथे नोकरी शोधून द्यावी. मात्र, गावातील ओबीसीच्या अन्नात माती मिसळू नये, अशी खोचक टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी नांदेड येथे माध्यमांशी बोलताना केली.Lakshman Hake
आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील यांनी दिल्लीला जाण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी खोचक टीका केली. ओबीसी नेते हाके गुरुवारी नांदेड दौऱ्यावर आले होते. त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पुढे ते म्हणाले, जरांगे यांनी दिल्लीऐवजी अमेरिकेला जावे. पण महाराष्ट्रातील गावातील ओबीसीच्या अन्नात माती मिसळू नयेLakshman Hake
. झुंड गोळा करून महाराष्ट्र सरकारला जीआर काढायला लावायचा आणि महाराष्ट्रातील सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे उद्योग करायचे, असेदेखील ते म्हणाले. शासनाला विनंती करतो, जरांगे यांना अमेरिकेत नोकरी द्यावी आणि एक-दोन वर्षे तिकडेच राहू द्या, अशी खिल्ली हाके यांनी उडवली. आरक्षणावरून गावागावात निर्माण झालेल्या ओबीसी-मराठा संघर्षावरही त्यांनी आपले मत व्यक्त केले. जोपर्यंत जीआर रद्द होणार नाही, तोपर्यंत संघर्ष सुरूच राहणार असल्याचे ते म्हणाले. हैदराबाद गॅझेट मराठा समाजाला लागू होत असेल, तर बंजारा समाजालाही आरक्षण मिळायला पाहिजे, असेदेखील प्रा. लक्ष्मण हाके म्हणाले.
Lakshman Hake Criticizes Manoj Jarange Patil
महत्वाच्या बातम्या
- अलंद मतदारसंघातील मतदार वगळल्याचा राहुल गांधी यांचा दावा दाव्यावर निवडणूक आयोगाने फेटाळला
- Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले – पराली जाळणाऱ्यांना अटक का नाही, दंड अपुरा, शेतकऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज
- साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!
- Nirmala Sitharaman : GST सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेत 2 लाख कोटी येतील; अर्थमंत्री म्हणाल्या- दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होतील, सामान्य लोकांकडे जास्त पैसे शिल्लक राहतील