• Download App
    Manoj Jarange Patil सर्वपक्षीय नेते जाताहेत मनोज जरांगेंच्या घरी; पण जरांगे मात्र मौलानाच्या दारी!!

    Manoj Jarange Patil : सर्वपक्षीय नेते जाताहेत मनोज जरांगेंच्या घरी; पण जरांगे मात्र मौलानाच्या दारी!!

    विशेष प्रतिनिधी

    छत्रपती संभाजीनगर : आपली विधानसभेचे निवडणूक वाचावी, किमान आपल्या मतदारसंघात तरी कुठला त्रास होऊ नये, यासाठी सर्व पक्षांचे नेते आणि इच्छुक मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या घरी जात आहेत, पण मनोज जरांगे मात्र मुस्लिम धर्मगुरूच्या दारी गेले. त्यांनी अंतरवाली सराटीतून छत्रपती संभाजीनगर मध्ये येऊन मुस्लिम धर्मगुरू ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल नाव बोर्डाचे अध्यक्ष मौलाना सज्जाद नोमानी यांची भेट घेतली. त्यांच्याशी दोन तास चर्चा केली. manoj jarange patil meets muslim religous leader sajjad nomani

    मनोज जरांगे यांनी उभ्या केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचा धसका घेत सर्वपक्षीय नेत्यांनी अंतरवाली सराटी मध्ये जाऊन जरांगे यांच्या भेटी घेतल्या. या बहुतांश भेटी रात्रीच्या होत्या. यामध्ये राजेश टोपे, रोहित पवार पृथ्वीराज चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, अशोक चव्हाण आदी प्रमुख नेत्यांचा समावेश होता. त्यातही राजेश टोपे त्यांना नियमित भेटत राहिले. मनोज जरांगे यांनी सातत्याने देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले असले, तरी मध्यंतरी त्यांनी फडणवीस यांची देखील मध्यरात्रीनंतर फोनवरून चर्चा केली होती.



     

    मराठा आरक्षण आंदोलनाच्या धाकाने सर्व पक्षाने त्यांना अंतर्वली सराटी मध्ये खेचून आणणारे मनोज जरांगे स्वतः मात्र मुस्लिम धर्मगुरुला भेटायला गेले. त्यांनी मौलाना सज्जाद नोमानी यांच्याशी दोन तास चर्चा केली. सज्जन नोमानी हे काँग्रेस आणि समाजवादी पार्टी या दोन पक्षांचे समर्थक मानले जातात. अखिलेश यादव यांच्या पिछडा + दलित + आदिवासी अर्थात “पीडीए” फॉर्म्युलाला नोमानी यांनी पाठिंबा दिला होता. वक्फ बोर्ड सुधारणा कायद्याला त्यांचा विरोध आहे. मोदी, शाह, भागवत हे मुसलमानांचे “भाई” आहेत. ते चुकीचे काही करणार नाहीत, असा धमकीवजा इशारा त्यांनी दिला होता. काशीमधील ज्ञानवापी वरील मुस्लिमांचा ताबा सोडायला ते तयार नाहीत.

    मराठा + मुस्लिम कॉम्बिनेशनची तयारी

    पण सज्जाद नोमानी हे मुस्लिम विद्वान आहेत. त्यांच्या समाजात त्यांचे वेगळे वजन आहे. अशा माणसाला भेटायला गेल्यानंतर त्यांचे विचार समजून घेतले पाहिजेत. त्यांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे. त्यांनी विचार करण्यासाठी दोन दिवस मागितले आहेत. ते दोन दिवसांत राज्यातल्या मुस्लिम धर्मगुरूंशी चर्चा करून आपला निर्णय सांगतील, पण एक वेगळा समीकरण उभे राहिले पाहिजे. त्यानंतरच सर्वसामान्यांना न्याय मिळू शकतो, असे वक्तव्य मनोज जरांगे यांनी या भेटीनंतर केले. याचा अर्थ मनोज जरांगे हे मुस्लिम + मराठा कॉम्बिनेशन उभे करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाले.

    manoj jarange patil meets muslim religous leader sajjad nomani

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस