विशेष प्रतिनिधी
बीड : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी आज नगद नारायण गडावरून मोठमोठ्या डरकाळ्या फोडल्या. त्यांच्या तोंडी कचका दाखवतो आणि उलथापालथीची भाषा आली. आम्ही मराठा क्षत्रिय आहोत. आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही कुणाचे ऐकत नसतो. आमच्यावर अन्याय होतो आहे. मला चहूबाजूंनी घेरले आहे, असे सांगून जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीच्या विरोधात मतदान करण्याचे अप्रत्यक्ष आवाहन मराठा समाजाला केले.
नगद नारायण गडावर बारा बलुतेदारांचा, सर्व अठरा पगड जातींचा दसरा मेळावा होईल, असे मनोज जरांगे यांनी सुरुवातीला जाहीर केले होते. मात्र प्रत्यक्षात त्यांचे सगळे भाषण मराठा समाज केंद्रितच झाले. मराठा समाज कोणावर अन्याय करत नाही तो सगळ्या जाती जमातींना बरोबर घेऊन जातो, असे मनोज जरांगे म्हणाले.
आपल्या समाजाच्या नाकावर टिच्चून जर कुठली निर्णय होत असतील, समाजातल्या लेकरांवर कोणी अन्याय करत असेल, तर आपण गप्प बसायचे कारण नाही. आपल्या समुदायासाठी, आपल्या लेकरा बाळांसाठी यावेळी उलथापालथ करावीच लागेल. समाजाची शान वाढवण्यासाठी समोरच्याला गाडावाच लागेल, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
आपण कर्माने क्षत्रिय आहोत. माझ्या एका शब्दाची चूक झाली तर सगळ्या समाजाला सहन करावे लागेल म्हणून मी गप्प बसतोय पण आपण इथून हाणत हाणत निघालो, तर गुजरात हरियाणा पानिपत कटक पर्यंत हाणत जाणारा हा समाज आहे, असा इशारा देखील मनोज जरांगे यांनी दिला.
Manoj Jarange patil from Narayangad
महत्वाच्या बातम्या
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नैना हे महाराष्ट्राला पॉवर हाऊस बनविणारे प्रकल्प – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- Pakistan cricket team : पाकिस्तान क्रिकेट संघाच्या नावावर लज्जास्पद विक्रम!
- Sayaji shinde : स्टार प्रचारक सयाजी शिंदेंची अजितदादांकडे एन्ट्री; राष्ट्रवादीतली थांबविणार का गळती??
- Mahadev : महादेव बेटिंग ॲपचा मास्टरमाईंडला दुबईत अटक