• Download App
    Manoj Jarange मौलाना सज्जाद नोमानींना मनोज जरांगेंमध्ये "दिसले" गांधी + आंबेडकर आणि मौलाना आझाद!!

    Manoj Jarange मौलाना सज्जाद नोमानींना मनोज जरांगेंमध्ये “दिसले” गांधी + आंबेडकर आणि मौलाना आझाद!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Manoj Jarange  मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी मौलाना सज्जाद नोमानी आणि आनंदराज आंबेडकर यांच्याबरोबर एकत्र पत्रकार परिषद घेऊन मराठा + मुस्लिम आणि दलित एकत्र आल्याचा दावा केला, तर त्याच पत्रकार परिषदेत मौलाना सज्जाद नोमानी यांना मनोज जरांगे यांच्यात आधुनिक भारतातले गांधी + आंबेडकर आणि मौलाना आझाद “दिसले”!! Manoj Jarange meet like Gandhi amebedkar and Maulana azad

    भारतीय संविधानासारखे दुसरे संविधान जगात उपलब्ध नाही. त्यातल्या प्रत्येक शब्दावर विचारविनिमय करूनच ते शब्द संविधानात समाविष्ट केले. त्यावेळी डॉ. आंबेडकर, महात्मा गांधी, मौलाना आझाद हे नेते होते. आता आधुनिक भारताच्या इतिहासात मनोज जरांगे हे आधुनिक काळातले गांधी, आंबेडकर आणि मौलाना आझाद यांच्यासारखेच संपूर्ण भारतात काम करतील, असा दावा करणारे कौतुक उद्गार मौलाना सज्जाद नोमानी यांनी काढले. जरांगे यांच्याकडून मराठी शिकण्याची आणि जरांगे यांना हिंदी शिकवण्याची जबाबदारी मौलाना सज्जाद नोमानी यांनी घेतली. मनोज जरांगे यांना हरियाणातून तसेच अन्य राज्यातून मागणी होती. परंतु, त्यांना हिंदी चांगले बोलता येत नसल्याने ते तिकडे गेले नाहीत. आता आमच्यात असे ठरले आहे की त्यांनी मला मराठी शिकवायचे आणि मी त्यांना हिंदी शिकवणार. मनोज जरांगे देशभर फिरले, तर मी त्यांची भाषणे अनुवादित करून सगळ्यांना सांगणार, असे मौलाना सज्जाद नोमानी म्हणाले. Manoj Jarange

    जरांगेंची दिली हाक नव्या परिवर्तनाची

    याच पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांनी दिली हाक नव्या परिवर्तनाची; एकाच खात्यात 2 – 2 दोन मंत्री आणि 7 – 8 उपमुख्यमंत्री करायची चालवली तयारी!! Manoj Jarange

    मनोज जरांगे यांनी मौलाना सज्जाद नोमानी आणि आनंदराज आंबेडकर यांच्या बरोबर पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रात मराठा, मुस्लिम आणि दलित एकत्र आल्याची घोषणा केली. त्याचवेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करून महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांनाही घरी घालवण्याची प्रतिज्ञा केली. गेल्या 70 वर्षात घडले नाही, ते आता घडते आहे. मराठा, मुस्लिम, दलित सगळे एकत्र येत आहेत. तुम्ही कोणी नाराज राहू नका. नाराज असाल, तर सोडून द्या. कुणी शिव्या दिल्या तर धाकट्या भावाने आपल्याला शिव्या दिल्या, असे म्हणून पुढे चला. तुम्ही सगळे सावध राहा. इच्छुकांनी जास्त ताणून धरू नये. आपल्याला पुढे मोठे परिवर्तन करायचे आहे. या परिवर्तनात एकाच खात्यात 2 – 2 मंत्री करू. मराठा, मुस्लिम, धनगर, ओबीसी, दलित असे 7 – 8 उपमुख्यमंत्री करू. बाकीची मंत्रीपदे, महामंडळे, जिल्हा परिषदा, मार्केट कमिट्या वगैरे आहेतच. सगळ्यांना सत्तेचा वाटा देऊ, असे मनोज जरांगे म्हणाले.

    पूर्वी आपल्याला सभेसाठी 100 एकर जागा पुरायची नाही. आता तर मराठा, मुस्लिम, दलित एकत्र आल्यावर 500 एकर जागा पुरणार नाही. 100 किलोमीटर पर्यंत ट्रॅफिक जाम झाला पाहिजे अशी गर्दी करू, अशी ही पुस्ती जरांगे यांनी जोडली.

    मात्र महाराष्ट्रात नेमके किती उमेदवार उभे करणार??, ते कोणत्या मतदारसंघात उभे करणार??, ज्यांनी फॉर्म भरलेत त्यापैकी किती जणांना नेमका पाठिंबा देणार आहे??, याविषयीचा निर्णय मात्र जरांगे यांनी आज जाहीर केला नाही. तो 3 नोव्हेंबर पर्यंत पुढे ढकलला. आता अंतरवली सराटी मध्ये कोणी येऊ नका. तिथे गर्दी करू नका. आम्हाला निर्णय घेऊ द्या. 3 तारखेला निर्णय जाहीर करू. त्याआधी ओबीसी आणि बाकीच्या समाजाशीही बोलू, असे जरांगे यांनी स्पष्ट केले.

    Manoj Jarange meet like Gandhi amebedkar and Maulana azad

    हत्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा