विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : Manoj Jarange मराठा आरक्षणाला विरोध करा हे राहुल गांधी (लाल्याने) विजय वडेट्टीवार यांच्यासारख्या काँग्रेस नेत्यांना सांगितल्याचे दिसत आहे. काँग्रेस मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलताना दिसून येत आहे. मराठा समाजाने लोकसभा निवडणुकीत काँग्रेसवर उपकार केले त्या उपकाराची परतफेड काँग्रेसकडून सुरू आहे, असे
मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.Manoj Jarange
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, राहुल गांधी अशाने काँग्रेसचा सुफडा साफ होईल, मग वडेट्टीवारांना एकट्याला जवळ घेऊन बसा. मराठवाड्यातील सर्व मराठा समाज कुणबी आहे त्यांना प्रमाणपत्र वाटप सुरू करावे अन्यथा आम्ही जर पुन्हा आंदोलन केले तर सरकारला अवघड जाईल हे मुख्यमंत्री आणि विखे पाटील यांना जाहीर सांगतो. मराठा समाजाच्या मनात तुमच्याबद्दल जी प्रतिमा तयार झाली आहे हे खराब होऊ देऊ नका. संभाजीनगर आणि जालन्यात 2 लाख 54 हजार कुणबी होते ते कुठे गायब झाले ते लोकं गेले कुठे याचे उत्तर सरकारने द्यावे, असे म्हणतात मराठवाड्यातील मराठा हेच कुणबी आहेत. मजा बघू नका नाही तर तुमच्या नरड्यावर येईल, मग पळायला जागा मिळणार नाही.Manoj Jarange
..हे फक्त लाभार्थी टोळीचे नेते
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाच्या आरक्षणाला फाटा फोडला जाईल असे एकही पाऊल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारने उचलू नये. कारण आमचे आरक्षण हे हक्काचे आहे. मुख्यमंत्र्यांनी जातीयवादी लोकांचे ऐकून मराठा पोरांचे नुकसान होईल असे पाऊल उचलू नये, अन्यथा त्यांचे परिणाम भोगावे लागतील. वडेट्टीवार हे मराठा आरक्षणाविरोधात केवळ मतांसाठी बोलत आहेत. त्यांचे कोणी ऐकत नाही. राहुल गांधी (लाल्याने) सांगितले असेल ते हे बोलत आहेत. जातीचा नेता समजणारे वडेट्टीवारांसह कोणीही ओबीसीचे नेते नाही. हे फक्त लाभार्थी टोळीचे नेते आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांचे औकातच ओळखली आहे. हे ओबीसींचे नेते होऊ शकत नाही हे फडणवीस यांना समजले आहे.
वडेट्टीवार तुमच्या भाषेवर आमची भाषा ठरणार
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आता कुणीही मराठा आरक्षणाचा जी आर रद्द करु शकत नाही. हैदराबाद गॅझेट च्या अनुषंगाने तो जी आर काढण्यात आला आहे. मराठवाड्यातील मराठा हा कुणबी आहे. हा जी आर रद्द करणे काही सोपं नाही. आम्ही पण मागणी केली आहे की, 1994 चा जी आर रद्द करण्यात यावा. तर 50 टक्क्याच्या वर गेलेले आरक्षण रद्द करावे, असे निवेदन आम्हीही सरकारला देणार आहोत. वडेट्टीवार तुमच्या भाषेवर आमची भाषा ठरणार आहे. छगन भुजबळ हे काही सर्व माळी समाजाचे नेते नाही, ते थोड्या लोकांचे नेते आहेत. ते ओबीसी समाजाचे नेते होऊ शकत नाही. तर वडेट्टीवार हे कोणत्या जातीचे आहे हे सुद्धा माहिती नाही पण ते ओबीसीचे नेते नाही ते केवळ टोळीचे नेते आहे.
..अन्यथा पुन्हा आंदोलन करु
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी तथाकथित ओबीसी नेत्यांचे ऐकून मराठा समाजाच्या विरोधात काहीही निर्णय घेऊ नये. छगन भुजबळ हे तुमचे सरकार अडचणीत आणण्यासाठी आले आहेत. ते पाऊल मराठ्यांना उचलायला लावू नका. आम्हाला ते पाऊल उचलायचे नाही. आम्हाला गॅझेट नुसार कुणबी प्रमाणपत्र वाटण्याचे काम दिवाळीपूर्वी सरकारने सुरू करावे अन्यथा पुन्हा आंदोलन करण्यात येईल असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.
Manoj Jarange is angry at the Congress’s stance, directly warns Rahul Gandhi that the party’s finances will be cleared
महत्वाच्या बातम्या
- Israel : इस्रायलने गाझाकडे जाणारे 13 जहाज रोखले:ग्रेटा थनबर्गसह 150 जणांना अटक; 30 मदत जहाजे अजूनही मार्गावर
- सायबर फसवणुकीविरुद्ध राज्याची सज्जता : जागतिक दर्जाची लॅब्स, त्वरित प्रतिसाद आणि व्यापक जनजागृती
- President Putin : रशियाचे अध्यक्ष पुतिन म्हणाले – भारत अमेरिकेच्या दबावापुढे झुकणार नाही, मी मोदींना ओळखतो, भारतीय अपमान सहन करत नाहीत
- Arun Lad : पुणे पदवीधर मतदारसंघात राजकीय खेळी ; शरद लाड यांचा भाजप प्रवेश ?