विशेष प्रतिनिधी
सोलापूर : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण मागितले. त्यामुळे विविध ओबीसी जातींशी मराठ्यांचे गावागावांमध्ये वैमनस्य निर्माण झाले. मराठ्यांनी आणखी किती जातींशी वैमनस्य घ्यायचे??, असा सवाल करत बार्शीतील युवकाने मनोज जरांगे यांच्या विरोधात उपोषण करण्याचा इशारा दिला. Jarange how many castes did the Marathas take enmity
मनोज जरांगे यांच्या आंदोलनला आता एक वर्ष पूर्ण झाले. वाशी येथे तर समाजाच्या अनेक मोठ्या मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. पण एक वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या हाती काय लागले??, असा उद्वेग स्वतः जरांगे यांनी नुकताच अंतरवाली सराटी येथे व्यक्त केला होता. त्यानंतर त्यांनी राज्य सरकारला पुन्हा अल्टिमेटम दिला. त्यानंतर आपण उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यातच आता खुद्द जरांगे यांच्याविरोधातच एका उपोषण होऊ घातले आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्यांच्या जाहीरनाम्यात मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत आश्वासन देण्यासाठी सांगणार का?? सोलापुरातील बार्शी तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी मनोज जरांगे यांना असा सवाल विचारला आहे. आठ दिवसात या प्रश्नांची उत्तरे न दिल्यास मनोज जरांगे यांच्या विरोधात उपोषणाला बसणार, अशी घोषणा करण्यात आली आहे. बार्शी तालुक्यातील मराठा नेते अण्णासाहेब शिंदे यांनी मनोज जरांगे यांना सवाल केला आहे.
Suhas Yathiraj : पॅरालिम्पिक 2024: भारताला 12वे पदक, सुहास यथीराजने बॅडमिंटनमध्ये रौप्यपदक जिंकले
किती जातींशी वैमनस्य घ्यायचं ते तरी सांगा!!
महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर किती दिवसात मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार हे त्यांच्याकडून लिहून घ्या. मनोज दादा यापूर्वी मराठा-मुस्लिम वाद, मराठा-दलित वाद आणि आता मराठा ओबीसी वाद सुरू आहे. त्यामुळे आणखी किती जातींशी वैमनस्य घ्यायचे ते सांगा, असा सवाल शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना विचारला आहे.
नाहीतर उपोषणाला बसणार
देवेंद्र फडणवीस यांना हटवताना मराठा असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार पाडून आपण ब्राह्मण असलेल्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी बसवून मराठा समाजावर अन्याय करणार नाही का?? पुढील आठ दिवसांत माझ्या या प्रश्नांचे निरसन न केल्यास बार्शीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसून आंदोलन करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
Manoj Jarange how many castes did the Marathas take enmity
महत्वाच्या बातम्या
- Suhas Yathiraj : पॅरालिम्पिक 2024: भारताला 12वे पदक, सुहास यथीराजने बॅडमिंटनमध्ये रौप्यपदक जिंकले
- PM Modi : …म्हणून पंतप्रधान मोदींनी पुन्हा घेतले भाजपचे सदस्यत्व!
- 2 महिन्यांवर निवडणूक आली तरी, महाराष्ट्रात काँग्रेस मुख्यमंत्री ठरवेना; पण 5 वर्षांनंतरच्या निवडणुकीत राहुल गांधींच्या पंतप्रधान पदाचा 100 % वायदा!!
- Vaishno Devi Yatra : वैष्णोदेवी यात्रेच्या मार्गावर मोठी दरड कोसळली, अनेक लोक अडकले