विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात विषय कुठलाही पुढे आला की तो फडणवीसांना नेऊन भिडवा, असला एककलमी कार्यक्रम मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी चालविल्याचे त्यांच्याच वक्तव्यांमधून समोर आले.
मराठा आरक्षणाच्या विषयापासून ते एसटी कर्मचारी संपपर्यंतचे सगळे विषय मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नेऊन भिडवले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाच्या काळात मराठा आरक्षण दिले. ते मुंबई हायकोर्टात टिकवून दाखवले. पण शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी खटका उडाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे सरकार राज्यात येऊ शकले नाही. त्याऐवजी ठाकरे – पवार सरकार आले आणि त्यांनी मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात अडवून ठेवले. पण मनोज जरांगे यांनी शिव्या फडणवीसांनाच घातल्या.
गेल्या वर्षभरात शिंदे फडणवीस सरकारने मराठा समाजासाठी भरपूर योजना दिल्या. विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला आरक्षण दिले. पण मनोज जरांगे यांनी आंदोलनाचा टेम्पो चालवत ठेवण्यासाठी मराठा आरक्षण मागणीचा ट्रॅक बदलून मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी करून फक्त फडणवीसांना टार्गेट करायला सुरवात केली. एकनाथ शिंदे किंवा अजितदादांविरोधात मनोज जरांगे “सॉफ्ट” बोलले.
आतातर शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, मराठवाडा, विदर्भात पावसाने झालेले नुकसान आणि एसटी कर्मचाऱ्यांचा संप या विषयांमध्ये देखील मनोज प्रचारांनी यांनी फडणवीस यांनाच टार्गेट केले फडणवीस कोणाला काही कामच करू देत नाहीत. कोणत्याही मंत्र्याला, आमदाराला तो काम करायला लागला की अडवतात. ते शेतकऱ्यांचा, मराठ्यांचा द्वेष करतात. फडणवीस मुख्यमंत्री असल्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा पगार त्यांनी वाढवला नाही. एकनाथ शिंदे यांच्या सरकारला तो वाढवू दिला नाही. त्यामुळे त्यांच्या सरकारचा मी कार्यक्रमाच करणार अशी धमकी वजा इशाऱ्याची भाषा मनोज जरांगे यांनी वापरली. यातूनच विषय कुठलाही पुढे आला की तो फडणवीसांना नेऊन भिडवा!!, हा मनोज जरांगे यांचा एककलमी कार्यक्रम उघड्यावर आला.
Manoj Jarange holds devendra fadnavis responsible for “all” problems of maharashtra
महत्वाच्या बातम्या
- Suhas Yathiraj : पॅरालिम्पिक 2024: भारताला 12वे पदक, सुहास यथीराजने बॅडमिंटनमध्ये रौप्यपदक जिंकले
- PM Modi : …म्हणून पंतप्रधान मोदींनी पुन्हा घेतले भाजपचे सदस्यत्व!
- 2 महिन्यांवर निवडणूक आली तरी, महाराष्ट्रात काँग्रेस मुख्यमंत्री ठरवेना; पण 5 वर्षांनंतरच्या निवडणुकीत राहुल गांधींच्या पंतप्रधान पदाचा 100 % वायदा!!
- Vaishno Devi Yatra : वैष्णोदेवी यात्रेच्या मार्गावर मोठी दरड कोसळली, अनेक लोक अडकले