विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे आणि शरद पवार यांचे छुपे संबंध एक्सपोज व्हायला लागल्यावर महाराष्ट्रातील संघर्षात संवाद साधण्याची भूमिका शरद पवारांनी जाहीर केली. Manoj Jarange finally admitted that he had secret meetings with some leaders
त्यानंतर शरद पवार काय म्हणतात, यापेक्षा माझे संस्कार, माझे मन मला काय सांगते हे महत्त्वाचे, असे मनोज जरांगे म्हणाले. परंतु त्याचवेळी त्यांनी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांसमवेत गुप्त बैठका घेतल्याची कबुली दिली, पण त्या नेत्यांची नावे मात्र सांगायला मनोज जरांगे यांनी नकार दिला. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाबाबत मोठे संशयाचे मळभ निर्माण झाले आहे.
मनोज जरांगे यांनी काही नेत्यांसोबत गुप्त बैठका घेतल्याची चर्चा उघडपणे होऊ लागल्यावर तशा बैठका झाल्याची कबुली अखेर मनोज जरांगे यांनी दिली. पण या चर्चांबाबत प्रश्न विचारले असता, राजकारणात काही गोष्टी उघड करायच्या नसतात, असे मनोज जरांगे म्हणाले. कुणासोबत गुप्त बैठका झाल्या ते नंतर जाहीर करू सामाजिक न्यायासाठी ही राजकीय लढाई आहे. आम्हाला आरक्षण द्या. तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू, अशी लालूच मनोज जरांगे यांनी सरकारला दाखवली.
मनोज जरांगे हे आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला पाडण्याचे डाव खेळत आहेत. राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य न केल्यामुळे जरांगे आता मोठी राजकीय खेळी करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. पण राज्य सरकारने आपल्या मागण्या मान्य केल्या तर आपला राजकारणाशी काही संबंध येणार नाही, अशी पुस्ती मनोज जरांगे यांनी जोडली.
जरांगे काय म्हणाले?
राजकारणात काही गोष्टी उघड करायच्या नसतात. काही संकेत असतात ते पाळायचे असतात. राजकारणातला संकेत ज्याला कळतो तो यशस्वी होतो असे त्यामागचे गमक आहे. त्यामुळे गुप्त बैठका झाल्या, पण त्या कशाच्या झाल्या, ते आम्ही एक-दोन दिवसांनी जाहीर करू. सामाजिक न्यायासाठी ही राजकीय लढाई आहे. तिला नाईलाज आहे, असा दावा मनोज जरांगे यांनी केला.
राजकारणातली गुप्तता हे मला सत्ताधारी आणि विरोधक या चाब्र्या लोकांनी शिकवले. आम्ही त्यांना वारंवार सांगत होती की, आम्हाला या लफड्यात नाही पडायचं. मी टीव्ही 9 मराठीच्या माध्यमातून आजही प्रामाणिकपणे सांगतो की, मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात यायचे नाही. मी खरे ते सांगतोय. आमचे आम्हाला द्या. राजकारण तुम्हाला लखलाभ. मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील. या शब्दाचा अर्थ सत्ताधारी तुम्ही समजून घ्या. अन्यथा तुमच्या हातात पश्चात्तापाशिवाय काहीच राहणार नाही, अशी दमबाजी मनोज जरांगे यांनी केली.
‘जनतेचा खरा मित्र मीडिया’
आमदार सदाभाऊ खोत यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. त्या वक्तव्यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. आंदोलनाच्या पाठीशी माध्यमांवर एक दहशतवादासारखा दबाव सुरु आहे, असं वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केले. आहे. त्यांच्या या वक्तव्याबाबत मनोज जरांगे यांना प्रश्न विचारला असता, त्यांच्याकडून तशी दहशत असेल, जनतेकडून माध्यमांवर दहशत नाही, असं जरांगे म्हणाले. जनतेला माध्यम हे एकच माध्यम आहे. -जनतेला न्याय देणारं प्रामाणिक व्यासपीठ म्हणजे मीडिया. सामान्य जनतेला आनंदी चेहरा करणारा आधारस्तंभ असेल तर मीडिया आहे. दहशत, दादागिरी हे तुमचे शब्द आहेत. ते सरकारला शोभतील. जनतेला नाही. जनतेचा खरा मित्रच मीडिया आहे, असा दावाही मनोज जरांगे यांनी केला.
Manoj Jarange finally admitted that he had secret meetings with some leaders
महत्वाच्या बातम्या
- Sudhir mungantiwar targets sharad pawar : 7 खासदारांच्या नेत्याला पंतप्रधान सोडा, गृहमंत्री देखील होता येत नाही, तेव्हाच…!
- कुपवाडात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, ५ जवान जखमी, एक शहीद
- आरबीआय ग्रेड बी भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, जाणून घ्या, पात्रता काय असावी?
- विधान परिषदेत शेकापचा उमेदवार पडला, मविआतले छोटे पक्ष दुखावले, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा आता स्वबळाचा नारा!!