नाशिक : मराठा समाजाला फडणवीस सरकारने ओबीसी मधून आरक्षण दिले नाही त्याचबरोबर सरसकट सगेसोयरे अंमलबजावणी देखील केली नाही. पण हैदराबाद आणि सातारा गॅझेटिअर लागू करण्याची मागणी आणि अन्य काही मागण्या सरकारने मान्य केल्या. त्यानंतर मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या उपस्थितीतच उपोषण सोडण्याचा आग्रह धरला. पण हे तीनही नेते मुंबईच्या बाहेर आहेत, असे कारण सांगून राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे यांना उपोषण सोडायला लावले. अखेरीस विखे पाटील यांच्या हस्ते मनोज जरांगे यांनी उपोषण सोडले.Manoj jarange ends his fast in the absence of Devendra fadnavis, eknath Shinde and Ajit Pawar
मुंबई हायकोर्टाचे तडाखे
मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनासंदर्भात मुंबई हायकोर्टाने जे जबरदस्त तडाखे हाणले, त्याचा परिणाम म्हणून मनोज जरांगे यांना प्रत्यक्षात माघार घ्यावी लागली. कारण मुंबईमध्ये मनोज जरांगे यांच्या समर्थकांनी चार दिवस धुडगूस घातला होता मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालचे आंदोलन भरकटले होते. त्याचे परखड वाभाडे मुंबई हायकोर्टाने काढले. मनोज जरांगे यांना तातडीने आझाद मैदान सोडायला सांगितले. त्यांच्या सगळ्या समर्थकांना मुंबई बाहेर काढायला सांगितले. जरांगे समर्थक आंदोलकांनी गेले चार दिवस मुंबई वेठीला धरली होती. तशी तुम्ही वेठीला का धरू दिली??, अशा शब्दांमध्ये हायकोर्टाने सरकारला देखील झापले होते.
जरांगे यांच्यासमोर पर्याय नव्हता
या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांना आज आंदोलन मागे घेणे भागच होते. त्यांच्यापुढे दुसरा पर्याय उरला नव्हता. त्यामुळे सरकारने आज त्यांच्यासमोर अंतिम मसुदा मांडला.फडणवीस सरकारने नेमलेल्या उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत, जयकुमार गोरे, माणिकराव कोकाटे हे मनोज जरांगे यांच्या भेटीला आझाद मैदानावर पोचले. तिथे त्यांनी तो अंतिम मसुरा त्यांना दिला तो अंतिम मसुदा मनोज जरांगे यांनी आझाद मैदानावर आंदोलन करायला बसलेल्या समर्थकांच्या समोर वाचला त्याच वेळी त्यांनी उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री इथे यायला पाहिजेत ते इथे आले म्हणजे त्यांच्याबरोबरचे आमचे वैर मिटून जाईल, नाहीतर वैर टिकून राहील, अशी भाषा वापरली. पण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मुंबईत नाहीत मी उपसमितीचा अध्यक्ष या नात्याने सरकारच्या वतीने तुम्हाला सगळे आश्वासने देतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला तशी संधी दिली आणि अधिकार दिले म्हणूनच मी इथे आलो आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांचीही या गोष्टीला संमती आहे. त्यामुळे तुम्ही उपोषण सोडा, अशी विनंती विखे पाटील आणि उदय सामंत यांनी केली. त्यानंतर मनोज जरांगे यांनी विखे पाटील यांच्या हस्ते मोसंबी रस घेऊन उपोषण सोडले.
एकनाथ शिंदे आधी आले होते, म्हणून…
या आधीच्या आंदोलनात मनोज जरांगे यांना पटवण्यासाठी त्यावेळचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नवी मुंबई वाशी येथे आले होते. एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला म्हणून एकमेकांचा हात उंचावून मराठा समाजाच्या मोर्चाला अभिवादन केले होते. त्याचा मोठा जल्लोष झाला होता. मग त्यावेळी जर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आपल्याला भेटायला आले असतील तर आताच्या मैदानावरच्या आंदोलनात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला भेटायला याला काय हरकत आहे असा पवित्रा मनोज जरांगे यांनी घेतला होता. पण तो पवित्रा फारसा टिकवून धरणे त्यांच्या हिताचे नव्हते. कारण मुंबई हायकोर्टाने त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना परखड शब्दांमध्ये तडाखे हाणून ताबडतोब आझाद मैदान सोडायला सांगितले होते. त्यामुळे मनोज जरांगे यांना हायकोर्टाच्या आदेशानुसार आझाद मैदान सोडणे भागच पडणार होते. त्यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हजेरीचा आग्रह धरणे मनोज जरांगे यांना कायदेशीर दृष्ट्या परवडले नसते. त्यांनी तसा आग्रह धरला असता आणि आझाद मैदान सोडायला वेळ लावला असता, तर कोर्टाची कठोर कायदेशीर कारवाई त्यांच्यावर झाली असती. कारण मुंबई हायकोर्ट मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थकांचे सगळे कारनामे बारकाईने बघत होते.
हायकोर्टाच्या दबावापुढे झुकावेच लागले
त्यामुळे कोर्टाच्या प्रचंड दबावापुढे मनोज जरांगे यांना झुकावेच लागले. त्याचवेळी हैदराबाद आणि सातारा गॅझेट लागू करण्याचा आग्रह मान्य करून फडणवीस सरकारने मनोज जरांगे यांना सन्माननीय escape root काढून दिला. यातून फडणवीस सरकारने ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण लागू केले नाही तसेच सरसकट सगेसोयरे हा निर्णय देखील लागू केला नाही. कारण सरसकट या शब्दाला सुप्रीम कोर्टाने आक्षेप घेऊन तो बाजूला काढला होता.
उपोषण सोडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीचा आग्रह जर मनोज जरांगे यांनी रेटून धरला असता, आझाद मैदान सोडायला वेळ लावला असता, तर मुंबई हायकोर्टाने फडणवीस सरकारला मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थकांना आझाद मैदानावरून कायदेशीर बळाने हटविण्याचे आदेश दिले असते. मग उपोषण सोडण्याचे सगळेच मूसळ केरात गेले असते. म्हणून मनोज जरांगे यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मोसंबीचा रस घेऊन उपोषण सोडले. हायकोर्टाचे परखड निरीक्षण आणि फटकारणे यामुळे मनोज जरांगे यांना बधावे लागले, हे यातले खरे रहस्य ठरले!!
Manoj jarange ends his fast in the absence of Devendra fadnavis, eknath Shinde and Ajit Pawar
महत्वाच्या बातम्या
- India Becomes Ukraine : भारत युक्रेनचा सर्वात मोठा डिझेल पुरवठादार बनला; जुलैमध्ये दररोज 2,700 टन डिझेल विकले
- Trump : ट्रम्प यांचा जपानवर अमेरिकी तांदूळ खरेदीसाठी दबाव; संतप्त जपानी शिष्टमंडळाने दौरा रद्द केला
- Manoj Jarange : हुल्लडबाज आंदोलक की सरकार हे समजून घ्या, मनोज जरांगे यांचे पत्रकारांना आवाहन
- Kiren Rijiju : राहुल यांचे नाव न घेता रिजिजू म्हणाले- त्यांना चर्चा नकोय; हा फक्त पॉलिटिकल ड्रामा