• Download App
    Manoj Jarange मनोज जरांगे यांची घोषणा, विधानसभेला 7 ठिकाणी देणार उमेदवार

    Manoj Jarange : मनोज जरांगे यांची घोषणा, विधानसभेला 7 ठिकाणी देणार उमेदवार

    विशेष प्रतिनिधी

    छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मोठी घोषणा केली आहे. जरांगे यांनी काही मतदारसंघामंध्ये निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. त्यांनी काही मतदारसंघाच्या नावांच्या घोषणा देखील केली आहे. मनोज जरांगे 7 मतदारसंघामध्ये उमेदवार उभे करणार असून 6 मतदारसंघांमध्ये उमेदवार पाडण्याची मोहीम राबवणार आहे. तर 2 मतदासंघांमध्ये पाठिंबा देण्याचे जरांगे यांनी ठरवले आहे.

    मनोज जरांगे दसऱ्यादिवशी मेळाव्यात आपली राजकीय भूमिका सांगितली होती. जिथे आपली ताकद आहे तसेच ज्या भागात अन्य पक्षांचे, गटांचे समर्थन मिळणे शक्य आहे तेथे निवडणूक लढवण्यार असल्याचे त्यांनी सांगितले होते. तसेच एससी, एसटी या आरक्षित जागांवर उमेदवार उभे करणार नसून ज्या जागांवर आपली ताकद नाही, त्या ठिकाणी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडायचे, असा त्रिसुत्री कार्यक्रम मनोज जरांगे यांनी सांगितला होता.

    मनोज जरांगे खालील मतदासंघात निवडणूक लढवणार

    बीड जिल्ह्यातील केज आणि बीड शहर
    जालना जिल्ह्यातील परतूर
    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री
    हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली शहर
    परभणी जिल्ह्यातील पाथरी
    नांदेड जिल्ह्यातील हदगाव


    RPI Athwale group सतत डावलले जात असल्याने‎ रिपाइं (आठवले गट) नाराज, महायुतीचा प्रचार करणार नसल्याची भूमिका


    येथे करणार पाडापाडी

    जालना जिल्ह्यातील भोकरदन
    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर
    हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी
    परभणी जिल्ह्यातील गंगाखेड आणि जिंतूर
    लातूर जिल्ह्यातील औसा

    या मतदारसंघात देणार पाठिंबा

    जालना जिल्ह्यातील बदनापूर राखीव मततदारसंघ आणि छत्रपती संभाजीनगर शहर पश्चिम या दोन मतदारसंघात पाठिंबा देण्याचे मनोज जरांगे यांनी ठरवले आहे.

    मराठा-मुस्लिम-मागासवर्गीय समीकरणाच्या तयारीत

    मनोज जरांगे पाटील यांनी मराठा-मुस्लिम-मागासवर्गीय असे समीकरण तयार करत या निवडणुकीत उमेदवार उभे करण्याची रणनीती आखली आहे. या निमित्त आंतरवाली सराटी येथे मुस्लिम धर्मगुरु सज्जाद नोमानी मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी देखील काही दिवसांपूर्वी येऊन गेले आहेत. यावेळी आनंदराज आंबेडकर देखील उपस्थित होते.

    Manoj Jarange’s announcement, candidate for 7 seats in the Legislative Assembly

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!