विशेष प्रतिनिधी
मुंबई : Dhananjay Munde मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एक गंभीर प्रकरण उघड केल्याचा दावा केला आहे. रंजना नागपूरकर या महिलेने केलेल्या आरोपांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, त्यांच्या पती प्रदीप नागपूरकर हे पोलिस दलात कार्यरत होते. एका प्रकरणाचा निकाल अनुकूल लावून देण्यासाठी धनंजय मुंडे यांना 17 लाख रुपये देण्यात आल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आहे. मात्र पैसे देऊनही अपेक्षित काम झाले नाही, असे त्यांनी म्हटले आहे.Dhananjay Munde
जरांगे पाटील यांच्या म्हणण्यानुसार, या आर्थिक व्यवहारामुळे आणि कामाच्या अनिश्चिततेमुळे नागपूरकर कुटुंबावर मोठा मानसिक ताण निर्माण झाला. रंजना नागपूरकर यांनी असा दावा केला आहे की, या प्रचंड मानसिक दबावाखालीच त्यांच्या पतीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे त्या पूर्णपणे कोलमडून गेल्या असून न्याय मिळावा म्हणून त्यांनी आपली व्यथा मांडली आहे, असे जरांगे यांनी सांगितले. त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही केली.Dhananjay Munde
या आरोपांदरम्यान जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही उल्लेख केला. देवेंद्रजी, कदाचित तुम्हाला ही बाब माहिती नसेल; पण हा प्रकार तुमच्याच जवळच्या नातेवाईकांशी संबंधित आहे, असे ते म्हणाले. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभा फडणवीस यांच्या बहिणीची मुलगी नागपूरकर यांच्या घरी दिलेली असल्याचा उल्लेख त्यांनी केला. त्यामुळे हे प्रकरण तुमच्या जवळच्या पाहुण्यांशी संबंधित आहे, असे सांगत त्यांनी सरकारने संवेदनशीलतेने लक्ष घालावे, असे आवाहन केले.
जरांगे पाटील यांनी पुढे सांगितले की, रंजना नागपूरकर त्यांच्याकडे भेटीसाठी आल्या होत्या. त्या अत्यंत व्यथित अवस्थेत होत्या आणि रडत होत्या, असे त्यांनी सांगितले. पतीच्या निधनाला हेच प्रकरण कारणीभूत असल्याचा त्यांचा ठाम आरोप आहे. न्याय मिळवण्यासाठी त्या प्रयत्न करत असून, आपले पैसे परत मिळावेत आणि जबाबदारांवर कारवाई व्हावी, अशी त्यांची मागणी आहे.
मुंडे यांच्या समोरच पिस्तूल लावले – रंजना नागपूरकर
रंजना नागपूरकर यांनी केवळ पैशांची फसवणूक झाल्याचा आरोप केलेला नाही, तर धमकीचाही गंभीर दावा केला आहे. पतीच्या निधनानंतर जेव्हा त्या आपले पैसे परत मागण्यासाठी परळी येथे गेल्या, तेव्हा त्यांना मुंडे यांच्या समोरच पिस्तूल लावून धमकावण्यात आले, असा त्यांचा आरोप आहे. पैसे परत न देता उलट जीवे मारण्याची भीती दाखवून त्यांना हाकलून लावण्यात आले, असे त्यांनी म्हटले आहे. या सर्व आरोपांमुळे राज्यात खळबळ उडाली असून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी विविध स्तरातून होत आहे.
Dhananjay Munde in Trouble? Manoj Jarange Alleges ₹17 Lakh Bribery Case
महत्वाच्या बातम्या
- नारी तू नारायणी’ परिषदेचे २१ फेब्रुवारीला पुण्यात आयोजन; महिलांच्या आत्मनिर्भरतेवर होणार विचारमंथन
- Tarique Rahman : बांगलादेशी पंतप्रधान तारिक रहमान यांच्यावर निवडणुकीत गैरव्यवहार केल्याचा विरोधकांचा आरोप
- महाविकास आघाडीची पुरती झाली गोची; दोन मोठे “वजीर” बनलेत खासदारकी आणि आमदारकीसाठी “प्यादी”!!
- Canada : कॅनडाने 2025 मध्ये 2,800 भारतीयांना बाहेर काढले, 6,500 भारतीयांना बाहेर काढण्याची तयारी