• Download App
    Manoj jarange agitation against yashwantrao Chauhan's vision of Maharashtra मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची तीन टार्गेट्स;

    मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची तीन टार्गेट्स; पण ती यशवंत सूत्राच्या विरोधातलीच!!

    Manoj Jarange

    मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे हत्यार घेऊन मनोज जरांगे मुंबईतल्या आझाद मैदानात पोहोचले असले आणि त्यांनी जाहीरपणे मराठा आरक्षणाचा एल्गार केला असला तरी जरांगे यांच्या आंदोलनाची वेगवेगळी वळणे आणि वळसे पाहता, तीन टार्गेट्स असल्याचे लक्षात येते. मराठा सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षणाच्या आवरणाखाली राजकीय आरक्षण साध्य करून घेणे, देवेंद्र फडणवीस नावाच्या ब्राह्मण मुख्यमंत्र्याला हटविणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या प्रवृत्तीच्या हातात संपूर्ण महाराष्ट्र सोपविणे ही तीन टार्गेट्स आहेत. शरद पवारांच्या राजकीय भूमिका बदलांशी अनुकूल ठरणारी टार्गेट्स जरांगेंना त्यांनी दिली आहेत.Manoj jarange agitation against yashwantrao Chauhan’s vision of Maharashtra

    जरांगेंनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून मराठवाडा पेटवून पाहिला. पण विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. कारण दोन्ही विभागांमधले प्रस्थापित मराठी भाजपच्या सत्तेच्या वळचणीला येऊन पोहोचले. हे तेच प्रस्थापित मराठी होते आणि आहेत जी काँग्रेसी सत्ता संस्कृतीच्या राजकारणात मुरले होते. त्यामुळे त्यांनी वारे फिरताच भाजपचा आश्रय घेतला आणि ते प्रस्थापित मराठ्यांची सत्ता दृढमूल करण्यात मग्न झाले. पण या सगळ्यात यशवंत शिष्य शरद पवारांच्या हातातली महाराष्ट्रातील सूत्रे निसटून गेली. आपण म्हणतो मुख्यमंत्री सत्तेवर बसला पाहिजे, आपण म्हणून त्या फाईलवर सही केली पाहिजे आणि आपली “सिस्टीम” मंत्रालयात राबवली पाहिजे, या शरद पवारांच्या सगळ्या अपेक्षा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातल्या प्रस्थापित मराठ्यांनी फोल ठरविल्या. त्यामुळे शरद पवारांना मनोज जरांगे नावाचे कथित वादळ निर्माण करावे लागले‌. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत या वादळाचा अनुकूल परिणाम झाला पण विधानसभा निवडणुकीत हे वादळ पूर्णपणे शमून गेले. त्याचा तोटा शरद पवार आणि त्यांच्या भोवतालच्या पक्षांना सहन करावा लागला.



    – हिंदू संस्कृतीला राष्ट्रवादीचा विरोध

    म्हणून मनोज जरांगे यांना पुन्हा मैदानात उतरविण्याचा खेळ पवारांना खेळावा लागला. त्यासाठी ऐन गणेशोत्सवाची वेळ निवडणे हे राष्ट्रवादीच्या सनातन हिंदू धर्मविरोधी वैचारिक सूत्राचेच प्रतीक आहे. सनातन हिंदू धर्मातल्या सणांचा आर्थिक फायदा घ्या पण त्यांना तात्विक विरोध करा हे राष्ट्रवादीचे सनातन हिंदू धर्म विरोधी वैचारिक सूत्र आहे. त्यामुळेच विठ्ठल, गणपती, देवी अशा दैवतांवर आणि प्रतिकांवर वेगवेगळे हल्ले चढवायचा प्रकार सुरू असतो. यातूनच मग त्यांच्या पांडुरंगाला मटण चालते. याचाच वेगळा सूत्रपात मनोज जरांगे यांच्या गणेशोत्सवातल्या आंदोलनात झाला.

    – भाषा पुरोगामी, पण वर्चस्व मराठ्यांचे

    महाराष्ट्रात काँग्रेसी संस्कृतीतले मराठ्यांचे राज्य सुखनैव सुरू होते. त्या राज्यकर्त्यांची तोंडी भाषा पुरोगामी होती, पण सत्ताकारणाची भाषा मराठा वर्चस्ववादी होती. तोपर्यंत सगळे ठीक चालले होते. त्यावेळी मराठा आरक्षणाचा विचार सुद्धा शरद पवार यांच्यासारख्या पुरोगामी नेत्याला त्याज्य वाटत होता. म्हणून तर शालिनीताई पाटलांसारख्या नेत्यांना त्यांनी दूर केले होते. पण मराठा वर्चस्वाला धक्का देण्यात भाजप यशस्वी झाला. त्यात सुरुवातीला त्यांना शिवसेनेची साथ सुद्धा त्यांना मिळाली. (हे भाजपच्या सध्याच्या नेतृत्वाला मान्य नसले, तरी सत्य नाकारण्यात मतलब नाही.) भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे ब्राह्मण असलेले पण सर्वगामी आणि सर्वमान्य असलेले नेतृत्व रुजविले. त्यामुळे खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस संस्कारित प्रवृत्तीच्या नेत्यांना धक्का बसला त्यांच्या सत्तेमध्ये आणि सत्ता संस्कृतीमध्ये इतरांचा मोठा वाटा निर्माण झाला. मराठा वर्चस्व ढासळून पवारांची प्रतिमाहानी झाली. म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला आणि त्यानिमित्ताने सगळ्या भाजपला सुरुंग लागला पाहिजे याची तजवीज केली गेली. राज्याच्या राजकारणावर मराठ्यांचे पुन्हा आपल्याला हवे तसे वर्चस्व निर्माण करायचे असेल तर तो मार्ग राजकीय आरक्षणातून जातो हे लक्षात घेऊन मनोज जरांगे नावाचे तथाकथित वादळ उभे करण्यात आले. या वादळात देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व उधळले गेले तर ठीकच, समजा नाही उधळले गेले, तर निदान मराठ्यांचे राजकीय वर्चस्व पुन्हा निर्माण होईल. आपली “सिस्टीम” काम करू लागेल, अशी खूणगाठ पवार आणि त्यांच्या चेल्यांनी बांधली.

    – माडखोलकरांच्या प्रश्नाला यशवंतरावांचे उत्तर

    पण नेमके हीच यशवंत सूत्रांच्या विरोधातली राजकीय खेळी ठरलीय. कारण संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली, त्यावेळी यशवंतरावांना ग. त्र्यं. माडखोलकरांनी प्रश्न विचारला होता, हे राज्य मराठीचे की मराठ्यांचे??, त्यावेळी यशवंतरावांनी त्यांना उत्तर दिले होते मराठीचे. याचा अर्थ यशवंतरावांना महाराष्ट्रात फक्त मराठ्यांचे वर्चस्व मान्य नव्हते. महाराष्ट्रात इतर जातीच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना आणि जनतेलाही प्रगतीची संधी असेल हे सूत्र यशवंतरावांनी बोलून दाखविले होते. मनोज जरांगे यांचे आंदोलन या यशवंत सूत्राच्या विरोधात गेले आहे. ते यशस्वी होईल की नाही??, याविषयी दाट शंका आहे. कारण यशवंत शिष्याने हाती घेतलेले कुठले कार्य सकारात्मक यशस्वी होण्याचा इतिहास आणि वर्तमान नाही.

    Manoj jarange agitation against yashwantrao Chauhan’s vision of Maharashtra

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Supriya Sule : मराठा आंदोलनात सुप्रिया सुळेंच्या गाडीवर बाटल्या फेकल्या; मनोज जरांगेंना भेटून परतताना आंदोलकांचा घेराव

    Manoj Jarange : मनोज जरांगे म्हणाले- एकतर विजयी यात्रा, नाहीतर अंत्ययात्रा; आम्ही OBC सोबत जाणारच!

    Sumona Chakravarti : मराठा आंदोलकांकडून गैरवर्तन, दक्षिण मुंबईत अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीचा धक्कादायक अनुभव