Nai Varan Bhat Loncha Kon Nai Koncha : राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुखांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला आगामी मराठी चित्रपट “नाय वरण भात लोन्चा कोन नाय कोन्चा”चे ट्रेलर आणि लैंगिक सुस्पष्ट दृश्ये सेन्सॉर करण्यासाठी पत्र लिहिले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अल्पवयीन मुलांचा समावेश असलेल्या लैंगिक सुस्पष्ट सामग्रीच्या खुले प्रसारणाचा निषेध त्यांनी व्यक्त केला आहे. महेश मांजरेकरांच्या या चित्रपटाच्या ट्रेलरवरूनच वादाला सुरुवात झाली आहे. Manjrekar’s Nai Varan Bhat Loncha Kon Nai Koncha Controversy over sex scenes in the film, letter to the Ministry of Information and Broadcasting of the National Commission for Women
वृत्तसंस्था
मुंबई : राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुखांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला आगामी मराठी चित्रपट “नाय वरण भात लोन्चा कोन नाय कोन्चा”चे ट्रेलर आणि लैंगिक सुस्पष्ट दृश्ये सेन्सॉर करण्यासाठी पत्र लिहिले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अल्पवयीन मुलांचा समावेश असलेल्या लैंगिक सुस्पष्ट सामग्रीच्या खुले प्रसारणाचा निषेध त्यांनी व्यक्त केला आहे. महेश मांजरेकरांच्या या चित्रपटाच्या ट्रेलरवरूनच वादाला सुरुवात झाली आहे.
प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची सिनेसृष्टीत विविधांगी विषयांवरील चित्रपटांसाठी ओळख आहे. ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ असं या सिनेमाचं नाव आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. पोस्टरही चर्चेचा विषय ठरले आहे.
दिवंगत ज्येष्ठ नाटककार, पत्रकार जयंत पवार यांनी लिहिलेल्या ‘वरन भात लोन्चा नि कोन नाय कोन्चा’ या कथेवर हा सिनेमा आधारित आहे. या चित्रपटाची पटकथा आणि दिग्दर्शन महेश मांजरेकरांनी केले आहे. १४ जानेवारी रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या करोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं सरकारकडून राज्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. अशा काळात हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
तथापि, चित्रपटाच्या ट्रेलरमध्येच लैंगिक दृश्यांवरून आक्षेप घेण्यात आला आहे. विचित्र नावाच्या या चित्रपटाचे ट्रेलर अतिशय बोल्ड सीन्सने भरलेले आहे. ट्रेलर पाहून मेंदू बधिर होणार हे नक्की. दोन शाळकरी मुलांनी केलेली अचाट कामे मती गुंग करणारी आहेत. ही दोन मुलं मर्डर करणारी दाखवली आहेत. रक्तपात, बेछूट शिव्या, खून आणि सेक्स अशी भयंकर दृश्य ट्रेलरमध्ये दिसत आहेत. त्यामुळे हा चित्रपच १८ वर्षांखालील प्रेक्षकांसाठी नाही हे स्पष्टच आहे. या चित्रपटाची टॅगलाईनही तशीच आहे. “अठरा वर्षांवरील प्रेक्षकहो, दम असेल तरच थेटरात येऊन बघायचं.”
Manjrekar’s Nai Varan Bhat Loncha Kon Nai Koncha Controversy over sex scenes in the film, letter to the Ministry of Information and Broadcasting of the National Commission for Women
महत्त्वाच्या बातम्या
- भाजपला सोडचिठ्ठी देणाऱ्या स्वामी प्रसाद मौर्य यांच्या अटकेचे वॉरंट जारी, धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी न्यायालयाचा आदेश
- Weather Alert : महाराष्ट्रात कडाक्याची थंडी, महाबळेश्वरात पारा शून्यावर, दोन-तीन दिवसांत अवकाळीचीही शक्यता
- बळीराजासाठी आनंदाची बातमी : कापूस पोहचला साडेदहा हजार रुपये क्विंटलवर; पन्नास वर्षांतील विक्रमी भाव
- Sri Lanka Inflation : श्रीलंकेत महागाईचा कडेलोट, टोमॅटो 200 रुपये किलो, मिरची 700 च्या पुढे, परकीय चलनसाठ्यातही मोठी घसरण
- India-China Military Talks : भारत आणि चीनमध्ये लष्करी चर्चेची 14वी फेरी सुरू, 20 महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष सोडवण्यावर भर