• Download App
    Manikrao Kokate मुंडेंच्या अडचणीत वाढ होत असतानाच माणिकराव कोकाटेंना फसवणुकीबद्दल दोन वर्षांची शिक्षा; राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराचा फडणवीस सरकारला फटका!!

    Manikrao Kokate मुंडेंच्या अडचणीत वाढ होत असतानाच माणिकराव कोकाटेंना फसवणुकीबद्दल दोन वर्षांची शिक्षा; राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराचा फडणवीस सरकारला फटका!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई /नाशिक : संतोष देशमुख प्रकरण ते भ्रष्टाचाराचा चिखल यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे अडकले असतानाच राष्ट्रवादीचे दुसरे मंत्री माणिकराव कोकाटे यांना फसवणूक केल्याबद्दल दोन वर्षांची शिक्षा झाली. राष्ट्रवादीच्या या भ्रष्टाचाराचा भाजप महायुतीच्या फडणवीस सरकारला फटका बसला. Manikrao Kokate

    संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे आधीच अडचणीत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाचवायच्या नादी लागलेत. पण धनंजय मुंडे पुरते भ्रष्टाचाराच्या दलदलीत अडकलेत. ते मागच्या मंत्रिमंडळात कृषिमंत्री असतानाचे भ्रष्टाचार त्यांना घेरू लागलेत. अंजली दमानिया आणि विजय कुंभार यांनी धनंजय मुंडे यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढली. त्यासंदर्भातली काही कागदपत्रे सादर केली.

    परंतु, धनंजय मुंडे यांना फडणवीस आणि अजितदादांचा राजकीय आश्रय असल्याने त्यांनी आक्रमक होऊन अंजली दमानिया यांच्यावरच प्रत्यारोप केले. त्यानंतर विजय कुंभार यांनी प्रत्यक्ष कागदपत्रे दाखवून धनंजय मुंडे यांनी भ्रष्टाचारच केल्याचा आरोप केला. मंत्रिमंडळाचा निर्णय असल्याचे भासवून परस्पर १०० आणि ४०० कोटी रुपये उचलल्याचा उद्योग धनंजय मुंडे यांनी केल्याचा आरोप आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या भ्रष्टाचाराचा चिखल भाजप महायुतीच्या देवेंद्र फडणवीस सरकार वर उडाला आहे.

    त्या पाठोपाठ 1995 च्या एका फसवणूक प्रकरणात नाशिक जिल्हा न्यायालय राष्ट्रवादीचे दुसरे मंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची कारावासाची शिक्षा आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचा आरोप करून माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी त्यांच्यावर खटला भरला होता. त्याचा निकाल 29 वर्षांनी लागला. यामध्ये माणिकराव आणि सुनील कोकाटे कलम 420, 465 471 आणि 474 याखाली दोषी आढळले म्हणून नाशिक जिल्हा न्यायालयाने या दोघांनाही दोन वर्षे कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा फर्मावली. त्यामुळे विरोधकांनी आता माणिकरावांच्या राजीनामाची मागणी केली आहे. माणिकराव कोकाटे या निकाला विरोधात उच्च न्यायालयात दात मागणार आहेत.

    दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दिल्ली दौऱ्यावर असताना हे घडले आहे राष्ट्रवादीच्या जुन्या भ्रष्टाचार प्रकरणांचा फटका भाजप महायुतीच्या देवेंद्र फडणवीस सरकारला बसतो आहे. देवेंद्र फडणवीस सरकारकडे शिवसेना आणि भाजप यांचे पूर्ण बहुमत असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महायुती घेतल्याचा दुष्परिणाम भाजपला भोगावा लागतो आहे.

    Manikrao Kokate was sentenced to 2 years by the court

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!