विशेष प्रतिनिधी
नाशिक : देवेंद्र फडणवीस यांच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छगन भुजबळ यांना स्थान दिले नाही त्यामुळे त्यांनी सध्या तरी शाब्दिक बंड पुकारले, पण छगन भुजबळांच्या या बंडाची अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मंत्र्याने वेगळ्या प्रकारे खिल्ली उडवली.
मला वाटतं छगन भुजबळ यांनी पंतप्रधान व्हावे म्हणून ते पंतप्रधान होऊ शकतील का असं कोणाच्या वाटण्यावरून काही होता येतं का??, असा सवाल करून राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी करून भुजबळांच्या बंडाची खिल्ली उडवली.
छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेसने भरपूर दिले. ते 20 वर्षांपेक्षा जास्त काळ मंत्री होते. आता एकदा मंत्रीपद न दिल्याने ते नाराज झाले पण पक्षातले काही आमदार पाच – सहा वेळा निवडून आले, पण त्यांना कधीच पक्षाने संधी दिली नाही त्यांना आता संधी मिळाली असेल, तर ते बरोबरच आहे, असे माणिकराव कोकाटे म्हणाले. कुठल्याही एकाच नेत्याला सातत्याने संधी देणे कुठल्याच पक्षाला शक्य होत नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
नवे मंत्रिमंडळ करून चार-पाच दिवस झालेत म्हणून लगेच कोणी नाराजी व्यक्त करायला काही अर्थ नाही, असा टोला माणिकराव यांनी छगन भुजबळ यांना हाणला.
Manikrao kokate on chhagan bhujbal said
महत्वाच्या बातम्या
- पॉपकॉर्नपासून जुन्या गाड्यांपर्यंत ‘या’ वस्तू महागल्या!
- परदेशात जाणारे भारतीय म्हणजे आपल्या संस्कृतीचे राजदूत -सुनील आंबेकर
- खातेवाटपात गृहखात्यासकट फडणवीस आणि भाजपचे वर्चस्व; शिंदेंकडे खाती गृहनिर्माण आणि नगरविकास तर अजितदादांकडे अर्थ!!
- Sarangi : भाजप खासदार सारंगी अन् राजपूत यांच्या प्रकृतीबाबत आले अपडेट!