वृत्तसंस्था
उन्हाळा आणि आंबा यांचे अनोखे नाते आहे. या नात्याला बहर येतो तो अक्षय तृतीयेला ! कारण साडेतीन मुहूर्त मानल्या जाणाऱ्या अक्षय तृतीयेला आंब्याचा रस खाण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. आंबा हा औषधी गुणधर्माने युक्त आहे. अशा हा फळांचा राजा उन्हाळ्यात मिळणारा असल्यामुळे त्याचा आस्वाद नक्की घ्यावा. Mango, the king of fruits, has medicinal properties
- आंब्याचे गुण देखील भरपूर आहेत. या वृक्षाचे प्रत्येक अंग औषधी गुणाचे आहे. पक्व फळ म्हणजेच पिकलेला आंबा हा वात- पित्तशामक असतो तर कच्चा आंबा म्हणजेच कैरी ही अम्ल रसाची त्रिदोष प्रकोपक असते.
- – कैरी रुचिकारक, भूक वाढविणारी पण पित्त वाढविणारी असते. परंतु याचे पन्हे मात्र दाह आणि तहान शमन करणारे व थकवा घालविणारे असते. पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी रोज ते घेऊ नये.
- आंब्याची कोवळी पाने रस करून घेतल्यास मळमळ वांती यावर उपयोगी पडतात.
- आंब्याची फुले अतिसार थांबविणारी आहेत.
- आंब्याच्या वृक्षाची साल ही कषाय म्हणजे तुरट रसाची असते. साल उत्तम व्रणरोपक म्हणजे व्रण जखम भरून आणणारी असते.
- गर्भाशयावर आलेली सूज कमी करते. स्त्रियांना पांढरे पाणी जात असेल तर सालीच्या काढ्याने योनीधावन केल्यास योनी दुर्गंध तसेच श्वेतस्त्राव कमी होतो.
- कोयीच्या आतला गर हा कृमीनाशक आहे. तसेच अतिसारनाशक आहे. वारंवार मूत्र प्रवृत्ती होत असल्यास त्यावर उपयोगी ठरतो.
- पिकलेला आंबा! हा हृदयाला हितकर, मलबद्धता दूर करणारा, पौष्टिक, ताकद देणारा, वृष्य आहे. वर्ण चांगला करणारा आहे. वातशामक, पित्तशामक सर्वांना सुख देणारा असतो.
- आंबा अति खाण्याने अजीर्ण होऊ शकते. आंब्याला नेसर्गिकरित्या पिकविलेले असल्यास उत्तम. आंब्यांच्या देठाजवळील द्रव कधी कधी घश्यात खवखव, चेहऱ्यावर पुरळं फोड अशी लक्षणे निर्माण करू शकतो .त्यामुळे तो बराच वेळ पाण्यात ठेवून स्वच्छ करून वापरावा.
Mango, the king of fruits, has medicinal properties
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी दान केला ‘राधे-श्यामचा’ सेट; औषधं-ऑक्सिजन इ.सर्व खर्च करणार अभिनेता प्रभास
- आनंदाची बातमी : ‘कोविशिल्ड’ पाठोपाठ आता पुण्यात ‘कोवॅक्सिन’ लसीचीही निर्मिती !
- Lockdown Update : लॉकडाऊन पुन्हा माहिनाअखेर वाढणार; १५ मे नंतरही कायम राहण्याची शक्यता
- ग्रामस्थांचे साथी हात बढाना : लॉकडाऊनमध्ये चक्क तलावाची निर्मिती ; वाशिम जिल्ह्यातील पांगरी महादेव गावाचा प्रेरक उपक्रम