विशेष प्रतिनिधी
रत्नागिरी : तालुक्यातील गणेशगुळे येथील आंबा बागायतदार शशिकांत शिंदे यांच्या बागेतून सात हापूस आंबा पेट्या अहमदाबाद येथे रवाना झाल्या आहेत. Mango from Ratnagiri district goes to Gujarat; Boxes of hapus sent to Ahmedabad market
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आंबा पेट्या पाठवण्याचे त्यांचे हे सातवे वर्ष आहे. गणेशगुळे येथील शिंदे अनेक वर्ष आंबा व्यवसायात कार्यरत आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात हापूस कलमांची लागवड त्यांनी केलेली आहे.
सुरवातीच्या काळात पाडव्याच्या मुहूर्तावर आंबा परजिल्ह्यात पाठवण्याची पद्धत होती. परंतु बदलत्या हवामानाचा व वातावरणाचा अंदाज घेऊन त्यांनी बागेमध्ये केलेली मेहनत त्याला मिळालेली वातावरणाची साथ यामुळे गेली. सहा वर्ष जानेवारी ते फेब्रुवारीमध्ये पहिली हापूस आंबा पेटी पाठवण्याचा मान ते मिळवत आहेत. त्यामुळे या वर्षाताही पहिली हापूस आंबा पेटी बाहेरच्या मार्केटला पाठवण्याचा मान त्यांना मिळालेला आहे.
Mango from Ratnagiri district goes to Gujarat; Boxes of hapus sent to Ahmedabad market
महत्त्वाच्या बातम्या
- डीएसके’ फसवणूक प्रकरणाची सुनावणी आता मुंबईत
- पंजाबात पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीबाबत भाष्य करण्यास मोदींचा नकार, मात्र त्याचवेळी सांगितली पंजाबमधली भावूक आठवण!!
- पाच राज्यांच्या निवडणुकीत पहिल्या टप्प्यात उद्या मतदान; काँग्रेस, समाजवादी सह सर्व परिवारवादी पक्षांवर पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल!!
- पुणे, पिंपरी चिंचवड, चाकण परिसराचा वीजपुरवठा पूर्ववत